शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

प्रत्येक जिल्ह्यातून ५० डुकरांचे रक्त नमुने घ्या : महाराष्ट्र शासनाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 01:18 IST

केरळमध्ये फैलावलेल्या ‘निपाह’आजाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून ५० डुकरांच्या रक्तांचे नमुने गोळा करण्याचे आदेश पशुसंवर्धन विभागाने अधिकाऱ्यांना दिले आहेत.

ठळक मुद्दे‘निपाह’च्या पार्श्वभूमीवर तालुक्याला पथक, वटवाघळांवरही लक्ष ठेवण्याच्या सूचना

समीर देशपांडे ।कोल्हापूर : केरळमध्ये फैलावलेल्या ‘निपाह’आजाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून ५० डुकरांच्या रक्तांचे नमुने गोळा करण्याचे आदेश पशुसंवर्धन विभागाने अधिकाऱ्यांना दिले आहेत. आठ दिवसांत हे नमुने पुण्याला विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेकडे पाठवायचे आहेत.

केरळमध्ये ‘निपाह’च्या विषाणूंची लागण झाल्याने काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या रोगावर लस, उपचार उपलब्ध नसल्याने याचे गांभीर्य वाढले असून, त्या दृष्टीने महाराष्ट्र शासनानेही पावले उचलली आहेत. डुकरे आणि वटवाघळांच्या माध्यमातून या रोगाचे विषाणू पसरत असल्याने या दोन घटकांवर लक्ष कें द्रित करण्यात आले आहे.

त्यानुसार राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त कांतिलाल उमाप यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शुक्रवारी अधिकाºयांशी चर्चा केली आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातून ५० डुकरांचे रक्तनमुने घेऊन ते आठ दिवसांत पुण्याला चाचणीसाठी पाठवायचे आहेत. तसेच वटवाघळांच्या वस्तीवरही लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ‘मास्क’ घालून रक्त नमुने घ्या  डुकरांचे रक्त नमुने घेतानाही ‘एनक्यू ५’ हे विशिष्ट प्रकारचे मास्क वापरूनच रक्त नमुने घेण्यास पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाºयांना सांगण्यात आले आहे.प्रत्येक तालुक्यासाठी पथक‘निपाह’च्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्याला जलद प्रतिसाद पथक नेमण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये एक पशुसंवर्धन विभागाचा डॉक्टर आणि वटवाघळांच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी वनखात्याचाही एक कर्मचारी नियुक्त केला जाणार आहे.खाण्याचा सोडा, चुना फवारणीज्या ठिकाणी वटवाघळांची वस्ती आहे, अशा झाडांखाली खाण्याचा सोडा आणि चुन्याच्या भुकटीची फवारणी करण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत. वटवाघळांच्या विष्ठेतून या रोगाचा प्रसार होत असल्याने याबाबत दक्षता घेण्यास सांगण्यात आले असून, या फवारणीतून प्रसाराला प्रतिबंध होणार आहे.राज्यातील विदेशी डुकरे -३७,४५५राज्यातील देशी डुकरे - २,८८,३०१एकूण - ३,२५,७७६

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMedicalवैद्यकीय