शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सिंह राशीतील उल्कावर्षावाचा आज रात्री बारा वाजता घ्या अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 20:46 IST

अवकाशातील आतषबाजी पहायची असेल, तर आज रात्री तशी संधी आली आहे. सिंह राशीतील उल्का वर्षाव पाहण्याचा खगोलप्रेमींसह सर्वसामान्यांनाही संधी मिळणार आहे. १७ नोव्हेंबरच्या रात्री आकाशात सिंह राशीतून उल्कावर्षाव होणार आहे. ही अनोखी घटना साध्या डोळ्यांनीही पाहायला मिळणार आहे.

ठळक मुद्देटेम्पल टटल धूमकेतूआकाशात सिंह राशीतून उल्कावर्षाव होणार अमावस्येची रात्र असल्याने काळोखात होणारी आतषबाजी आणखीनच नयनरम्य

कोल्हापूर : अवकाशातील आतषबाजी पहायची असेल, तर आज रात्री तशी संधी आली आहे. सिंह राशीतील उल्का वर्षाव पाहण्याचा खगोलप्रेमींसह सर्वसामान्यांनाही संधी मिळणार आहे.१७ नोव्हेंबरच्या रात्री आकाशात सिंह राशीतून उल्कावर्षाव होणार आहे. ही अनोखी घटना साध्या डोळ्यांनीही पाहायला मिळणार आहे. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पूर्वक्षितिजावर सिंह रास उगवताच पहाटेपर्यंत उल्का वर्षाव पहायला मिळणार आहे. तासाला १५ ते २० उल्कांचा वर्षाव होताना अनुभवायला मिळेल. अमावस्येची रात्र असल्याने काळोखात होणारी ही आतषबाजी आणखीनच नयनरम्य दिसणार आहे.टेम्पल टटल धूमकेतूया दिवशी पृथ्वी टेम्पल टटल या धूमकेतूचा मार्ग (कक्षा) ओलांडून जाणार असल्यामुळे हा उल्कावर्षाव घडणार आहे. हा धूमकेतू दर ३३ वर्षांनी सूर्यमालेत येऊन सूर्याला फेरी मारून जात असतो. त्यावेळी धुमकेतुमधील काही द्रव्य त्याच्या मार्गावर ओसंडून जातात, त्यालाच अवकाशातील कचरा ( डेबरीज) असे म्हणतात.

जेंव्हा पृथ्वी या भागातून पुढे जात असते तेंव्हा गुरुत्वाकर्षणामुळे हा कचरा पृथ्वीकडे खेचला जातो आणि वातावरणाशी घर्षण होऊन तो पेट घेतो, तेंव्हा आकाशात एक लखलखीत प्रकाश शलाका चमकून जाते. काहीवेळेस मोठमोठे अग्निगोलसुद्धा दिसण्याची शक्यता आहे. या आतषबाजीमुळे पृथ्वीवासीयांना नभांगणात नयनरम्य रोषणाई पाहायला मिळणार आहे.धूमकेतूचा हा कचरा अंतराळात सिंहराशीच्या दिशेत असलेने या उल्का सिंह राशीतून पडत आहेत असे भासते. म्हणूनच या खगोलीय अविष्कारास लिओनीड्स- म्हणजे सिंह राशीतील उल्कावर्षाव असे म्हणतात. इतर राशिंमधूनही वर्षभरात लहान-मोठे वर्षाव होतच असतात. त्यांतील काही प्रेक्षणीय असतात . उदा. जेमिनिड, परसुअस त्यांप्रमानेच लिओनीड्स हा एक आहे.कोठे घ्यावा उल्का वर्षावाचा आनंद ?उल्कावषार्वाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी शहरापासून थोडे दूर, एखाद्या टेकडीवर किंवा डोंगरावर, अंधाºया ठिकाणी गेल्यास हा वर्षाव अतिशय सुस्पष्ट दिसेल. आपल्या घराच्या गच्चीवरुन किंवा विस्तीर्ण मैदानावरूनही हा उल्कापात पाहता येतो. शकता, पण तेथून संपूर्ण अवकाश दिसायला हवे. अशा ठिकाणी चटई अंथरून त्यावर पडून निवांत निरिक्षण करण्याचाही आनंद लुटता येईल.

आपली नजर पूर्व दिशेला उगवणाºया सिंह राशिकडे ठेवावी. कोणत्याही उपकरणाशिवाय केवळ साध्या डोळ्यांनी निरीक्षणाचा आनंद घेता येणार आहे. खगोलप्रेमी असाल तर या उल्कापाताच्या नोंदीही घेता येणार आहे. एखाद्या खगोल तज्ञ व्यक्तीसोबत हा उल्का वर्षाव पाहिल्यास आकाशातील नक्षत्र, राशी, तारका समूहांची माहितीही करून घेता येईल. यामुळे अवकाश निरीक्षणाचा आनंद द्विगुणित होणार आहे.नक्षत्र आणि त्यातून होणारे उल्कावर्षावनक्षत्र : क्वाड्रंटिड्सकाळ : डिसेंबर २८ ते जाने. ७ जानेवारी ३ताशी : ४५ ते २००रंग : निळसरनक्षत्र :अ‍ॅक्वेरिड्सकाळ : एप्रिल २१ ते मे १२ ,मे ५ ते ६ताशी : २०नक्षत्र : लायरिड्सताशी : एप्रिल १६ ते २५सर्वाधिक : एप्रिल २२ताशी : १०वेग : वेगवाननक्षत्र : डेल्टा अ‍ॅक्वरिड्सकाळ : जुलै १४ ते आॅगस्ट १८सर्वाधिक : जुलै २८ ते २९ताशी : १५ ते २०नक्षत्र : पर्सिड्सकाळ : जुलै २३ ते आॅगस्ट २२सर्वाधिक : आॅगस्ट १२ताशी : ८०वेग : वेगवाननक्षत्र : आयोटा अ‍ॅक्वेरिड्सकाळ : आॅगस्ट ११ ते सप्टें. १०सर्वाधिक : आॅगस्ट १ ते २ताशी : १०वेग : तेजस्वी संथनक्षत्र : कॅप्रिकॉर्निड्सकाळ : जुलै १५ ते सप्टें. ११सर्वाधिक : आॅगस्ट १ ते २ताशी : १०वेग : तेजस्वी संथनक्षत्र : ओरायनिड्सकाळ : आॅक्टो. १५ ते २९सर्वाधिक : आॅक्टो. २१ ते २२ताशी : २०वेग : वेगवाननक्षत्र : लिओनिड्सकाळ : नोव्हे. १४ ते २०सर्वाधिक : नोव्हे. १७ ते १८ताशी : १५०२०३१ मध्ये वाढण्याची शक्यतानक्षत्र : जेमिनिड्सकाळ : डिसें. ६ ते १९सर्वाधिक : डिसें. १३ताशी : ८०वेग : वेगवानरंग : पिवळसर

टॅग्स :scienceविज्ञान