शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातून ‘टेक आॅफ’ पुन्हा लांबणीवर, धावपट्टी दुरुस्तीचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 19:39 IST

 कोल्हापूर : केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी दिलेल्या ग्वाहीनुसार शुक्रवार (दि. १५) पासून कोल्हापूरमधून प्रवासी विमानाचे टेक आॅफ होण्याची आशा होती. मात्र, रनवे (धावपट्टी) दुरुस्तीचे काम आणि विमान उपलब्धतेअभावी विमानसेवेचा प्रारंभ पुन्हा लांबणीवर पडला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘उडान’ योजनेत कोल्हापूरचा समावेश झाल्यानंतर गेल्या सहा ...

ठळक मुद्देकोल्हापुरातून महिनाअखेरपर्यंत विमान सेवा सुरू होण्याची शक्यतारनवे (धावपट्टी) दुरुस्तीचे काम, विमान उपलब्धतेअभावी सेवेचा प्रारंभ लांबणीवर

 कोल्हापूर : केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी दिलेल्या ग्वाहीनुसार शुक्रवार (दि. १५) पासून कोल्हापूरमधून प्रवासी विमानाचे टेक आॅफ होण्याची आशा होती. मात्र, रनवे (धावपट्टी) दुरुस्तीचे काम आणि विमान उपलब्धतेअभावी विमानसेवेचा प्रारंभ पुन्हा लांबणीवर पडला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘उडान’ योजनेत कोल्हापूरचा समावेश झाल्यानंतर गेल्या सहा वर्षांपासून बंद असलेली कोल्हापूर-मुंबई प्रवासी विमानसेवा केव्हा सुरू होणार, हा कोल्हापूरवासीयांना प्रश्न पडला आहे. संबंधित योजनेतील समावेशानंतर वाहतूक परवाना आणि मुंबईतील स्लॉट (वेळ) या कारणास्तव विमानसेवा सुरू होण्यास विलंब होत होता.

भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि नागरी उड्डाण संचालनालय यांच्यातर्फे दि. २५ आणि २६ आॅक्टोबरला कोल्हापूरच्या विमानतळाची पाहणी केली. त्याचा अहवाल सादर झाल्यानंतर ‘डीजीसीए’कडून कोल्हापूर विमानतळाला प्रवासी वाहतूक परवाना देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.

या विमानसेवेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा म्हणून खासदार संभाजीराजे यांनी नोव्हेंबरमध्ये केंद्रीय मंत्री अशोक गजपती राजू यांची भेट घेतली. यावेळी मंत्री अशोक गजपती राजू यांनी दि. १५ डिसेंबरपासून विमानसेवा सुरू करण्याची ग्वाही दिली; पण याबाबतचे सध्याचे वास्तव पाहता विमानसेवेचा प्रारंभ पुन्हा लांबणीवर पडला आहे.

कोल्हापुरातून विमानसेवा पुरविण्याची तयारी दर्शविलेल्या कंपनीकडे साधारणत: दि. १८ डिसेंबरपर्यंत विमान उपलब्ध होईल. यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे महिना अखेरपर्यंत कोल्हापुरातून विमानसेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

धावपट्टी रविवारपर्यंत बंदसध्या विमानतळाच्या धावपट्टीचे काम सुरू आहे. त्यामुळे रविवार (दि. १७) पर्यंत धावपट्टी अधिकृतरीत्या बंद राहणार आहे. या दरम्यान, वातावरण ढगाळ राहिल्यास धावपट्टी बंद राहण्याचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :Airportविमानतळkolhapurकोल्हापूर