शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

नोकरीसाठी नव्हे, तर ज्ञानासाठी शिक्षण घ्या : - डी. ए. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:19 IST

आजच्या युवकांनी नोकरी मिळावी म्हणून शिक्षण घेऊ नये, तर व्यापक ज्ञानासाठी शिक्षण घ्यावे आणि या ज्ञानाच्या बळावर व्यवसायाची शिखरे पादाक्रांत करावीत, असे

ठळक मुद्दे‘आम्ही काळम्मावाडीकर’च्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

राधानगरी : आजच्या युवकांनी नोकरी मिळावी म्हणून शिक्षण घेऊ नये, तर व्यापक ज्ञानासाठी शिक्षण घ्यावे आणि या ज्ञानाच्या बळावर व्यवसायाची शिखरे पादाक्रांत करावीत, असे आवाहन राधानगरीचे गटशिक्षणाधिकारी डी. ए. पाटील यांनी केले.

ते विद्यामंदिर काळम्मावाडी येथे आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभप्रसंगी बोलत होते. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेला ‘आम्ही काळम्मावाडीकर’ या व्हॉटस अ‍ॅप गु्रपच्यावतीने या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ नाट्यकार सुनील माने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फराळेचे सरपंच संदीप डवर होते. यावेळी त्यांनी शैक्षणिक कार्यासाठी ग्रामपंचायतीच्यावतीने सर्वोतोपरी मदत करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले.

गुणवंत विद्यार्थी : किरण भाबर (बीएसस्स्सी ९० टक्के), अभिजित पाटील (बीए). अश्विनी पाटील, आरती हातकर (सिव्हील डिप्लोमा). स्नेहल मुंज, पूजा माने, राजश्री सुतार, शिवानी ढोकरे, संदेश ढोकरे (सर्व १२ वी ). सचिन सुतार, शार्दुल केळोस्कर, सानिका मुंज, सानिका माने, भाग्यश्री भोगुलकर, ज्योती भाबर (सर्व १० वी ).

यावेळी मुख्याध्यापक संतोष कांबळे, बाबूराव नाटेकर, ग्रामपंचायत सदस्या रेखा मुंज, अनिल माने, सुनील पातले, अनिल महाडिक, सागर केळोस्कर, जयवंत पाटील, सुनील महाडिक, अनंत मुंज, बाजीराव केळोस्कर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन रमाकांत पाटील यांनी केले. प्रस्ताविक चंद्रकांत पाटील यांनी केले. आभार वाय. डी. पाटील यांनी मानले.अपार कष्टाला पर्याय नाही : राजश्री पातलेपीएसआयपदी निवड झालेल्या राजश्री सुनील पातले (पनोरी) यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्या म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून आतापासूनच अभ्यासाचे नियोजन केले पाहिजे. संकटे येणार, अपयश येणार, यावर मात करतच जिद्दीने स्पर्धा परीक्षांमध्ये विजय मिळविला पाहिजे.

काळम्मावाडीत आयोजित सत्कार समारंभात गटशिक्षणाधिकारी डी. ए. पाटील यांचे स्वागत ज्येष्ठ नाट्यकार सुनील माने यांनी केले. यावेळी सरपंच संदीप डवर, मुख्याध्यापक संतोष कांबळे उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरjobनोकरीEducationशिक्षण