शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक इमारतींवर कारवाई करा, प्रशासक बलकवडे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 17:44 IST

Rain Muncipalty Kolhapur : पावसाळा तोंडावर आल्याने शहरातील धोकादायक इमारतींवर कारवाई करावी, किती इमारतींवर कारवाई केली, किती इमारती उतरवल्या, स्ट्रक्चरल ऑडीट किती इमारतींचे केले, किती इमारती दुरुस्त केल्या यासंबंधीची सविस्तर माहिती दोन दिवसात देण्याच्या सूचना महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पाऊस आणि संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.

ठळक मुद्दे धोकादायक इमारतींवर कारवाई करा, महापालिकेत बैठकप्रशासक बलकवडे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

कोल्हापूर : पावसाळा तोंडावर आल्याने शहरातील धोकादायक इमारतींवर कारवाई करावी, किती इमारतींवर कारवाई केली, किती इमारती उतरवल्या, स्ट्रक्चरल ऑडीट किती इमारतींचे केले, किती इमारती दुरुस्त केल्या यासंबंधीची सविस्तर माहिती दोन दिवसात देण्याच्या सूचना महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पाऊस आणि संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.प्रशासक डॉ. बलकवडे म्हणाल्या, पूरबाधीत क्षेत्रातील नागरिकांना कोरोनासंबंधीचे नियम पाळून स्थलांतरीत करण्याचे नियोजन करावे. त्यांच्यासाठी आताच आणखीन शाळा किंवा हॉल बघून ठेवावे. उद्यान व विद्यूत विभागाने शहरातील धोकादायक झाडे, पोल पावसापूर्वी उतरवून घेण्याची कार्यवाही करावी. महापूर आल्यास बाधीत क्षेत्रातील वाहने पार्किंग करण्यासाठी आणि जनावरे ठेवण्यासाठी विभागीय कार्यालयांनी आपल्या क्षेत्रातील ओपन स्पेस आरक्षित करावे. ज्याठिकाणी नाले सफाई झालेली आहे, अशा ठिकाणी पहिल्या मोठया पावसाने पुन्हा गाळ भरला असेल तर त्याठिकाणी पुन्हा चॅनेल साफ करुन घ्यावे.अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी आपत्ती व्यवस्थापनेचा आराखडा सादर केला. यावेळी उपायुक्त रविकांत आडसूळ, निखील मोरे, शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त चेतन कोंडे, संदीप घार्गे, जल अभियंता अजय साळोंखे, आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ, प्रशासन अधिकारी शंकर यादव, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, उपशहर अभियंता एन. एस. पाटील, नारायण भोसले, बाबूराव दबडे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, कनिष्ठ अभियंता मीरा नगीमे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :RainपाऊसMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर