शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘त्या’ शिक्षकांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्कआजरा : प्रथम सत्र संपत आले तरी नेमणुका देऊनही तालुक्यात जे शिक्षक हजर झालेले नाहीत, अशा शिक्षकांवर कारवाईची मागणी आजरा पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्यांनी केली.आजरा पंचायत समितीची मासिक सभा सभापती रचना होलम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. गटविकास अधिकारी एस. व्ही. केळकर यांनी स्वागत केले.सभेमध्ये उपसभापती शिरीष देसाई ...

लोकमत न्यूज नेटवर्कआजरा : प्रथम सत्र संपत आले तरी नेमणुका देऊनही तालुक्यात जे शिक्षक हजर झालेले नाहीत, अशा शिक्षकांवर कारवाईची मागणी आजरा पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्यांनी केली.आजरा पंचायत समितीची मासिक सभा सभापती रचना होलम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. गटविकास अधिकारी एस. व्ही. केळकर यांनी स्वागत केले.सभेमध्ये उपसभापती शिरीष देसाई यांनी आरोग्य ग्रामसभा घेण्यासंदर्भात सूचना केल्या. वीजवितरण कंपनीच्या मीटर्सचे डिस्प्ले गेल्याने अंदाजे बिल दिले जाते. वास्तविक, डिस्प्ले बदलण्याची जबाबदारी वीज वितरण कंपनीची आहे. अंदाजे व सरासरी बिलांचा फटका ग्राहकांना बसत आहे, असे उदय पवार व उपसभापती शिरीष देसाई यांनी स्पष्ट केले.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे-मुंबई मार्गावर जादा बसफेºया सोडण्यात येत असल्याचे आगारप्रमुख शिवराज जाधव यांनी सांगितले. लाकूडवाडी येथील धोकादायक डी.पी. बदलण्याची सूचना सभापती रचना होलम यांनी केली. चित्री प्रकल्पामध्ये ९५ टक्के, तर खानापूर धरणामध्ये ९२ टक्के पाणीसाठा असून, गतवर्षीच्या तुलनेत आजअखेर ५०० मि.मी. पाऊस कमी झाल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. लघुसिंचन विभागाने सोहाळे येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयाची अग्रक्रमाने दुरुस्ती करण्याबाबत उदय पवार यांनी सूचना केल्या. शिक्षण विभागात शिपायांसह अपुरा अधिकारी व कर्मचारी वर्ग नसल्याचे गटशिक्षणाधिकारी मोळे यांनी सांगितले.६ सप्टेंबरला आजरा तालुक्याची आढावा बैठक घेण्यात येणार असून, बैठकीस जि.प.चे अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. चर्चेत सहायक गटशिक्षण अधिकारी शरद भोसले, सदस्या वर्षा कांबळे, उदय पवार, आदींनी भाग घेतला. सभेस सदस्यांसह अधिकारी उपस्थित होते.साहेब काय सांगूवनविभागाचा आढावा घेण्याकरिता परिक्षेत्र वनअधिकारी उपस्थित राहू न शकल्याने सभेकरिता आलेल्या वनपालांनी साहेब मी काय सांगू? असा प्रश्न सदस्यांना उपस्थित केल्याने सभागृहात हशा पिकला. यावर उपसभापती शिरीष देसाई यांनी नाव सांगा आणि बसा, असा मिश्कील सल्ला दिला.