शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
3
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
5
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
6
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
7
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
8
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
10
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
11
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
12
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
13
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
15
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
16
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
17
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
18
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
19
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
20
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

lokmat mahamarathon kolhapur 2020 : टी-शर्ट, बीब, गुडीबॅगचे उद्या होणार वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 17:48 IST

‘लोकमत महामॅरेथॉन’च्या तिसऱ्या पर्वातील नावनोंदणीला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंसाठी उद्या, शनिवारी (दि. ४) सकाळी दहा वाजता राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृहात ‘बीब कलेक्शन एक्स्पो’ होणार आहे. त्यामध्ये आरोग्यविषयक सल्ला दिला जाणार आहे.

ठळक मुद्देटी-शर्ट, बीब, गुडीबॅगचे उद्या होणार वाटप‘बीब कलेक्शन एक्स्पो’मध्ये मिळणार आरोग्यविषयक सल्ला

कोल्हापूर : ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या तिसऱ्या पर्वातील नावनोंदणीला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंसाठी उद्या, शनिवारी (दि. ४) सकाळी दहा वाजता राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृहात ‘बीब कलेक्शन एक्स्पो’ होणार आहे. त्यामध्ये आरोग्यविषयक सल्ला दिला जाणार आहे.या सभागृहात सकाळी १० वाजता धावपटूंसाठी एक्स्पो सुरू होणार आहे. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता त्याचे उद्घाटन होईल. फिजिओथेरपिस्ट, आयर्नमॅन यांच्या गप्पा, त्यांचे अनुभवकथन आणि त्यांचा सत्कार समारंभ होणार आहे. त्यानंतर महामॅरेथॉनमध्ये धावण्याविषयी पेसर हे मार्गदर्शन करणार आहेत.

एक्स्पोच्या अखेरच्या सत्रात रविवारी (दि. ५ जानेवारी) पहाटे होणाऱ्या स्पर्धेची आणि नियमावलीची माहिती दिली जाणार आहे. सायंकाळी सात वाजता ‘बीब एक्स्पो’चा समारोप होणार आहे. या एक्स्पोमध्ये महामॅरेथॉनमधील विविध पाच गटांमध्ये सहभागी झालेल्या धावपटूंना टी-शर्ट, बीब (चेस्ट नंबर) आणि गुडीबॅग दिली जाणार आहे.

टी-शर्ट, बीब मिळविण्यासाठी हे आवश्यकज्या स्पर्धकांनी महामॅरेथॉनसाठी नावनोंदणी केली आहे, त्यांना टी-शर्ट, बीब आणि गुडीबॅग मिळविण्यासाठी त्यांच्या अथवा नोंदणीवेळी दिलेल्या मोबाईलवर आलेले एसएमएस, ई-मेल्स किंवा सभासद नोंदणी शुल्काची पावती सोबत आणावी लागणार आहे. सोबत आयडेंटिटी फोटो असावा. जे स्पर्धक स्वत: येऊन हे साहित्य घेऊ शकणार नाहीत, त्यांनी मित्र, नातेवाइकांकडे आॅथॉरिटी लेटर, रिसिट, ई-मेल्स पाठवून द्यावे; तर ते साहित्य त्यांना देण्यात येईल.

धावपटूंना ओळखण्यासाठी ‘बीब’ क्रमांक‘बीब’ म्हणजे धावपटू छातीवर लावतात तो कापडी फलक. कुठल्याही शर्यतीचा ‘बीब’ हा आत्मा मानला जातो. धावपटूंना ओळखण्यासाठी बीब क्रमांकाचा वापर होतो.

महामॅरेथॉन धावण्याचा मार्ग असा

  • ३ कि.मी. -पोलीस ग्राऊंड -पितळी गणपती- धैर्यप्रसाद चौक- सर्किट हाऊस- इंदुमती रोड- पुन्हा धैर्यप्रसाद चौक- पितळी गणपतीमार्गे- पोलीस ग्राऊंड.
  • ५ कि.मी.- पोलीस ग्राऊंड- पितळी गणपती चौक- धैर्यप्रसाद चौक- महासैनिक दरबार हॉल- पडवळे चौक- पुन्हा इंदुमती रोड- सर्किट हाऊस- धैर्यप्रसाद चौक- पितळी गणपतीमार्गे- पोलीस ग्राऊंड.
  • १० कि.मी.- पोलीस ग्राऊंड- धैर्यप्रसाद चौक- महासैनिक दरबार हॉल- पडवळे चौक- सर्किट हाऊस- पुन्हा धैर्यप्रसाद चौक- ताराराणी चौक- फ्लायओव्हर (उड्डाणपूल)- यू टर्न घेऊन पुन्हा ताराराणी चौक- धैर्यप्रसाद हॉल- सिंचन भवन- पितळी गणपतीमार्गे- सेंट फ्रान्सिस झेव्हिअर चर्च- डी. एस. पी. चौक - पोलीस ग्राऊंड.
  • २१ कि.मी.- पोलीस ग्राऊंड- धैर्यप्रसाद चौक- महासैनिक दरबार हॉल- पडवळे चौक- सर्किट हाऊस- धैर्यप्रसाद हॉल - ताराराणी पुतळा चौक- फ्लाय ओव्हर (उड्डाण पूल)- के. एस. बी. पी. चौक- शाहू टोलनाका - शांतिनिकेतन चौक यू टर्न - पुन्हा शिवाजी युनिव्हर्सिटी कॅम्पस- पुन्हा के. एस. बी. पी. चौक- फ्लाय ओव्हर (उड्डाणपूल) - ताराराणी पुतळा चौक- धैर्यप्रसाद चौक- सिंचन भवन- डी. एस. पी. चौक- पोलीस ग्राऊंड.

गटनिहाय महामॅरेथॉन सुरू होण्याची वेळ

  • २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन : ६.०० वाजता
  •  १० किलोमीटर पॉवर रन : ६ वाजून ३० मिनिटे.
  •  ५ किलोमीटर फन रन : ६ वाजून ४० मिनिटे.
  •  ३ किलोमीटर फॅमिली रन : ६ वाजून ४५ मिनिटे.

स्पर्धकांसाठी रिपोर्टिंग टाइमिंग असेमहामॅरेथॉनमधील विविध गटांत सहभागी झालेल्या धावपटू, स्पर्धक आणि नागरिकांनी पहाटे चार वाजता पोलीस ग्राऊंड येथे उपस्थित राहावे. रिपोर्टिंग टाइमिंग असे : २१ कि.मी. हाफ मॅरेथॉनसाठी ५ वाजता, तर १० कि.मी.साठीही ५ वा. पाच कि.मी. फन रनसाठी ५.४५ वाजता, तर ३ कि.मी. फॅमिली अ‍ॅँड सिटीझन रनसाठीही ५.४५ वाजता रिपोर्टिंग केले जाणार आहे. मार्गाची माहिती व पेसरचीही माहिती अनुक्रमे २१ कि.मी.साठी ५.२० वाजता, तर १० कि.मीसाठी ६ वा., ५ कि.मी.साठी ६ वा., ३ कि.मी.साठीही ६ वाजता दिली जाणार आहे.वॉर्मअप सेशन असा२१ कि.मी. हाफ मॅरेथॉनसाठी ५ वाजून ४० मिनिटांनी, तर १० कि.मी. व ५ कि.मी. व तीन कि.मी.साठी ६ वाजून १० मिनिटे अशी वेळ वॉर्मअपसाठी राहणार आहे.बीब नाही तर प्रवेशही नाहीकेवळ नोंदणी केलेल्या स्पर्धकांना प्रवेश दिला जाईल. सोबत बीब नाही तर स्पर्धेत प्रवेशही दिला जाणार नाही.बॅगेज काउंटरचीही सोय - स्पर्धकास बॅगेज काऊंटर सुरुवातीच्या क्षेत्रापासून पुरविले जाईल. बॅगेजची सर्वस्वी जबाबदारी स्पर्धकांची राहील.

सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांनी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाच्या माध्यमातून परिसराचा कायापालट केला. सहकार, शिक्षण, क्रीडा क्षेत्राला गती देण्याचे मोठे काम केले. प्रत्येक नागरिकाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी वारणा समूहाचे योगदान मोठे आहे. निश्चितच त्याचा फायदा प्रत्येक कर्मचारी, विद्यार्थी युवक वर्गाला झाला.‘लोकमत’च्या शैक्षणिक उपक्रमांमध्ये अनेक वेळा वारणा शिक्षण समूहाने सहभाग घेतला. वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, वारणा शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम, प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वारणा शिक्षण मंडळ, कोरे इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज अशा अनेक शिक्षण संस्थांमार्फत विद्यार्थी, विद्यार्थिनी, खेळाडू, शिक्षक, कर्मचारी यांच्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम सुरू केले आहेत. ‘लोकमत’चा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून या महामॅरेथॉनमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे.- बी. व्ही. बिराजदार,प्राचार्य, तात्यासाहेब कोरे पॉलिटेक्निक कॉलेज, वारणानगर

शारीरिक तंदुरुस्तीसाठी धावालोकमत महामॅरेथॉन युवा पिढीला नवचैतन्य देणारा एक उपक्रम आहे. धावपळीच्या या युगात प्रत्येकाने आपले चांगले आरोग्य राखण्यास व शारीरिक तंदुरुस्तीसाठी दररोज सकाळी चालण्याबरोबर धावण्याचाही सराव आवश्यक आहे. त्यामुळे माणसाचे शारीरिक व मानसिक संतुलन उत्तम राहण्यास मदत होईल. ‘लोकमत’ने दोन वर्षांपासून मॅरेथॉनसारखा उपक्रम हाती घेऊन कोल्हापूरकरांसह सर्वांना संधी उपलब्ध करून दिली आहे. मी स्वत: या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे. आपणही सहभागी व्हावे.- सुधीर कामेरीकर, अकौंट्स आॅफिसर, वारणा दूध संघ

धावण्यातून जगण्याचा आनंद लुटाधावपळीच्या जीवनशैलीत खरे तर धावण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने लोकांचे आरोग्यस्वास्थ्य बिघडू लागले आहे. बदलत्या जीवनशैलीमध्ये उत्तम शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राखायचे असल्यास नियमित सकाळी धावण्याशिवाय पर्याय नाही; त्यामुळे उत्तम आरोग्य व स्वास्थ्य राखण्यास मदत होणार असून, मी या स्पर्धेत नियमित सहभाग घेत असतो. ‘लोकमत’ समूहाने संपूर्ण महाराष्ट्रभर महामॅरेथॉन उपक्रम सुरू करून धावण्यातून आनंदी जीवन जगण्याची चांगली संधी निर्माण करून दिली आहे. मग चला तर कोल्हापूरकर, ‘लोकमत’ महामॅरेथॉन उपक्रमामध्ये आपण सहभागी होऊया. मी सहभागी झालो आहे. आपणसुद्धा व्हा...- प्रा. अजय चौगले, कोल्हापूर जिल्हाध्यक्षभारतीय जनता युवा मोर्चा (ग्रामीण)

 

टॅग्स :lokmat mahamarathon kolhapur 2020लोकमत महामॅरेथॉन कोल्हापूर 2020kolhapurकोल्हापूर