शहरं
Join us  
Trending Stories
1
"इजा, बिजा झाला, तिजाची वेळ आणू नका"; अजितदादांनी माणिकराव कोकाटेंना दिला होता इशारा
2
'कलाकेंद्रातील महिला गोळीच्या आवाजाने बेशुद्ध'; दौंड गोळीबारप्रकरणी आरोपींवर मकोका लावण्याच्या अजित पवारांच्या सूचना
3
'दिलबर जानी'चा कारनामा! १९ वर्षाचा तरुण महिला, तरुणींचे बनवायचा व्हिडीओ; 'बंगळुरू नाईट लाईफ'च्या नावाखाली...
4
IND vs ENG: दुष्काळात तेरावा महिना! दुखापतीमुळे ऋषभ पंत मालिकेतून बाहेर, ६ आठवडे विश्रांतीचा सल्ला
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांनो, Good News! ८वा वेतन आयोग कधी येणार? पगार किती वाढणार? जाणून घ्या सविस्तर!
6
फाटलेला टी-शर्ट अन् साइड रोल...; ज्योतिषाच्या 'त्या' भविष्याणीमुळे बदललं स्मृती इराणीचं आयुष्य
7
Post Office च्या MIS स्कीममध्ये २ लाख जमा केल्यास महिन्याला किती मिळेल व्याज; पटापट चेक करा
8
"हर्षल पाटीलला आम्ही काम दिलं नव्हतं, त्याने..."; कंत्राटदाराच्या मृत्यूवर अजित पवारांचे स्पष्टीकरण
9
गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज! STची एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ रद्द
10
बँकांकडून १२ लाख कोटींचे कर्ज बुडीत, कर्जाची रक्कम बँकांना परत मिळण्याची शक्यता कमी
11
मराठमोळा धमाका! आयुष म्हात्रेने वैभव सूर्यवंशीला टाकलं मागे; ९ षटकार खेचत रचला मोठा विक्रम
12
संपूर्ण बुलेट ट्रेन प्रकल्प कधी होणार? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तारीखच सांगितली
13
Russia Plane Crash: रशियात बेपत्ता विमान कोसळले, अपघातानंतर स्फोट; पाच चिमुकल्यांसह ४३ जण ठार
14
उद्या भारतात लाँच होणार इलेक्ट्रीक सुपर कार; किंमत किती असेल? कोणती कंपनी आणतेय...
15
अनिल अंबानी पुन्हा एकदा संकटात, अनेक ठिकाणी EDचा छापा; शेअर आपटले, आता कंपनीचं स्पष्टीकरण
16
Russia Plane Crash: रडारवरून गायब, घनदाट जंगलात कोसळले; रशियन विमान अपघाताचे कारण काय?
17
आता सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती कृत्रिम तलावातच विसर्जित करणं बंधनकारक; राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे निर्देश
18
काय सांगता! वाहतूक पोलिसांनी कार चालकाला दंड केला; हेल्मेट का घातले नाही असं विचारलं
19
चीअर्स! महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या उद्योगसमूहाने विकतच घेतला फ्रान्सच्या कंपनीचा व्हिस्की ब्रँड, 'डील'चा आकडा वाचून डोकं गरगरेल
20
चेकअपसाठी आलेला तरुण अचानक खाली कोसळला, आला हार्ट अटॅक; शॉक थेरपीने वाचला जीव

हाॅकी स्टेडियम चौकात तलवारहल्ला, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:26 IST

कोल्हापूर : येथील ध्यानचंद हॉकी स्टेडियम चौकात किरकोळ कारणावरून झालेल्या तलवारहल्ल्यात एक गंभीर जखमी झाला. उदय यादव (वय ४८, ...

कोल्हापूर : येथील ध्यानचंद हॉकी स्टेडियम चौकात किरकोळ कारणावरून झालेल्या तलवारहल्ल्यात एक गंभीर जखमी झाला. उदय यादव (वय ४८, रा. जुनी शाहू बँक, मंगळवार पेठ) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की, हॉकी स्टेडियम चौकातील खाऊ गल्लीत राजेंद्रनगरमधील काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी गोंधळ घातला. खाऊ गल्लीतील काही व्यावसायिकांकडून धमक्या देऊन खाद्यपदार्थांवर ताव मारला. यावेळी येथील चायनीज व्यावसायिक सचिन पडळकर याने या गुंडांना विरोध केला. संबंधित गुंडाने राजेंद्रनगरमधील काही सहकाऱ्यांना तेथे बोलावून घेतले. काही वेळातच पाच ते सहा जण नंग्या तलवारी घेऊन हाॅकी स्टेडियम चौकात आले. त्यांनी परिसरात दहशत माजवली. यावेळी विरोध करणाऱ्या सचिन पडळकर याचा, हातात तलवार घेऊन पाठलाग केला. याचवेळी परिसरातील गॅरेजमध्ये काम करणारा उदय यादव हा तेथे आला. त्याने वाद सोडविण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्यावरच या गुंडांनी तलवारहल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला. यामुळे परिसरात प्रचंड गोंधळ उडाला. जुना राजवाडा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमीवर सीपीआरमध्ये प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात स्थलांतरित केले. दरम्यान, रात्री उशिरा राजेंद्रनगरातील हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत होते.