शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

गोड बोलण्यातून प्रश्न सुटतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:11 IST

पैलवान हा तसा गरम डोक्याचा असतो. ‘तवा जाड असला की तो लवकर गार होत नाही,’ तसे पैलवानाचे असते; परंतु तिथेच खरी चूक होते. मी कायम नम्रतेने आणि विनयतेने बोललो व जगलोही. त्यातून मला मानसिक शांतता लाभली.

- हिंदकेसरी दीनानाथ सिंह -

पैलवान हा तसा गरम डोक्याचा असतो. ‘तवा जाड असला की तो लवकर गार होत नाही,’ तसे पैलवानाचे असते; परंतु तिथेच खरी चूक होते. मी कायम नम्रतेने आणि विनयतेने बोललो व जगलोही. त्यातून मला मानसिक शांतता लाभली.गोड बोलण्यातून प्रश्न सुटतात, असा माझा अनुभव आहे. नाही प्रश्न सुटला तरी नवीन प्रश्न निर्माण होत नाही; परंतु तुम्ही जर वाद घालत बसलात तर जुना प्रश्न तिथेच राहतो व नवीन प्रश्न तयार होतो. मी पैलवान असूनही आयुष्यभर कायमच गोड बोलत आलो. हल्ली कुटुंब असो की समाज... लोकांच्या बोलण्यात दुसऱ्याला टोचणाºया भाषेचा वापर जास्त होताना दिसतो. सहज बघा, तुम्हाला कुणी विचारले की, ‘पैलवानजी आपण जेवलात का?’ त्याला ‘होय, मी आताच जेवलो,’ असे उत्तर अपेक्षित आहे; परंतु तसे मिळताना दिसत नाही. ‘अजून राहिलोय का?’ असे आव्हानात्मक प्रत्युत्तर मिळते. जे संवाद तोडणारे असते.

माझ्या आयुष्यातील एक प्रसंग सांगतो. ही गोष्ट १९९६ ची. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. आम्ही एके दिवशी मंत्रालयात त्यांना सकाळी-सकाळी भेटायला गेलो; परंतु आधी वेळ घेतली नव्हती. त्यामुळे त्यांना आम्ही तिथेच ‘हिंदकेसरी’ असे मोठ्या अक्षरांत लिहून पत्र दिले. ते वाचून मुख्यमंत्री बैठक सोडून बाहेर आले. ‘महत्त्वाची बैठक असल्याने आज सकाळी मी गणेशदर्शन न घेता मंत्रालयात आलो; परंतु इथे तर साक्षात मारुतीच मला भेटायला आला आहे,’ असे सांगत त्यांनी हिंदकेसरी मारुती माने यांच्या हाताला धरून त्यांना आत नेले.

मी त्यांना म्हणालो, ‘मग तुम्ही देवाला उपाशी ठेवू नका. हिंदकेसरींच्या मानधनाचा विषय सोडवा.’ त्यावर त्यांनी ‘तुम्ही तुमच्या अध्यक्षांना (शरद पवार) का भेटला नाही?’ असे विचारले. ‘आम्ही त्यांना सहावेळा भेटलो; परंतु प्रश्न सुटलेला नाही,’ असे आम्ही त्यांना सांगितले. त्यावर मुख्यमंत्री मला म्हणाले, ‘पैलवानजी, आप बहुत मिठी बातें करते है!’ त्यावर मी म्हणालो, ‘सरजी, मैं बात भी मिठी करता हूँ, मेरा आचरण और चरित्र भी मिठा है।

मुख्यमंत्र्यांनी लगेच क्रीडा सचिवांना बोलाविले व त्वरित दरमहा एक हजार रुपये मानधन सुरू करण्याचे आदेश दिले. त्यावर सचिवांनी ‘ते पुढील वर्षापासून करता येईल,’ असे सांगण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी त्यांना ‘पुढील नव्हे, तर मागील वर्षापासून मानधन मंजूर करा,’ असे आदेश दिले. त्या वेळेपासून आमचे मानधन सुरू झाले आणि तेदेखील फक्त चांगल्या बोलण्यामुळेच...!                                                                                                    - हिंदकेसरी दीनानाथ सिंह