शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

कोल्हापूरच्या महापौरपदासाठी काँग्रेसकडून स्वाती येवलुजे यांची घोषणा, उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीचे सुनील पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 17:00 IST

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी काँग्रेसकडून स्वाती येवलुजे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीच्या सुनील पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजप-ताराराणी आघाडीकडून महापौर पदासाठी मनीषा कुंभार तर उपमहापौर पदासाठी कमलाकर भोपळे यांनी आपला उमेदवारी अर्ज नगरसचिव दिवाकर कारंडे यांच्याकडे सोमवारी दाखल केला.

ठळक मुद्देकोल्हापूरच्या महापौरपदासाठी काँग्रेसकडून स्वाती येवलुजे यांची घोषणा, उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीचे सुनील पाटील भाजप-ताराराणी आघाडीकडून महापौरपदासाठी मनिषा कुंभारउपमहापौर पदासाठी कमलाकर भोपळे

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी काँग्रेसकडून स्वाती येवलुजे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीच्या सुनील पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजप-ताराराणी आघाडीकडून महापौर पदासाठी मनीषा कुंभार तर उपमहापौर पदासाठी कमलाकर भोपळे यांनी आपला उमेदवारी अर्ज नगरसचिव दिवाकर कारंडे यांच्याकडे सोमवारी दाखल केला.

स्वाती येवलुजे

कोल्हापूरच्या महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक शुक्रवारी (दि. २२) होत असून त्या पार्श्वभूमीवर महापौरपदाचा उमेदवार निश्चितीसाठी रविवारी आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेस कमिटीत इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या, या पदासाठी आज, सोमवारी दुपारी १ वाजता नावाची उमेदवारांची घोषणा करण्यात आली. त्यांनी दुपारी नामनिर्देशन पत्र दाखल केले.हसिना फरास यांनी मंगळवारी महापौरपदाचा, तर अर्जुन माने यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन पदाधिकारी निवडणूक शुक्रवारी सर्वसाधारण सभेत होत आहे. स्वाती येवलुजे यांच्यासह काँग्रेसतर्फे महापौरपदासाठी दीपा मगदूम, उमा बनछोडे, नीलोफर आजरेकर इच्छुक होत्या.आमदार सतेज पाटील व शहर जिल्हा कॉँग्रेस समितीचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, नगरसेवक तौफिक मुल्लाणी, महिला काँग्रेस शहराध्यक्ष संध्या घोटणे यांनी रविवारी संवाद साधला तसेच महापौरपदासाठी इच्छुक असणाऱ्या दीपा मगदूम, स्वाती यवलुजे, उमा बनछोडे, नीलोफर आजरेकर या चारही नगरसेविकांच्या मुलाखती घेतल्या.ओबीसी महिला या प्रवर्गासाठी महापौरपद असल्यामुळे जे उमेदवार नामनिर्देशनपत्रे भरणार आहेत. त्यांना नामनिर्देशन पत्र भरताना सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची तसेच पडताळणी समितीने दिलेल्या वैधता प्रमाणपत्राची छायांकीत प्रत सादर करावी लागणार आहे. ही सभा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली होईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका