शहरं
Join us  
Trending Stories
1
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
2
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
3
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
4
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
5
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
6
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
7
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
8
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
9
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
10
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
11
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
13
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
14
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
15
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
16
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
17
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
18
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
19
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
20
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा

एफआरपीच्या चौदा टक्के वाढीसाठी ‘स्वाभिमानी’ची लढाई : राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 06:44 IST

Raju Shetti : जयसिंगपूर-उदगांव मार्गावरील कल्पवृक्ष गार्डनमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १९ वी ऊस परिषद ऑनलाईन पद्धतीने झाली.

जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) : यंदाच्या हंगामातील उसाला एकरकमी एफआरपीचा निर्णय झाला असून, पहिली उचल विनाकपात देण्यात यावी. ऊस तोडणी वाहतुकीच्या चौदा टक्के वाढीप्रमाणे शेतकऱ्यांचा वाढलेला उत्पादन खर्च गृहीत धरून एफआरपीच्या चौदा टक्क्यांप्रमाणे होणारी सरासरी दोनशे रुपये शेतकऱ्यांना मिळावेत, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना संघर्ष करणार असल्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी येथे झालेल्या ऑनलाईन ऊस परिषदेत केली. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी, यासाठी शेतकऱ्यांच्या सहीची मोहीम राज्यभर राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.जयसिंगपूर-उदगांव मार्गावरील कल्पवृक्ष गार्डनमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १९ वी ऊस परिषद ऑनलाईन पद्धतीने झाली. गेली तीन वर्षे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत असल्याचे सांगून राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या एफआरपीतून चौदा टक्के तोडणी वाहतूक वजा केली जाणार आहे. तोडणी वाहतुकीप्रमाणेच एफआरपीमध्येदेखील चौदा टक्के वाढ करावी.  यात एक रुपयाही कमी घेतला जाणार नाही. त्यासाठी गोडाऊनमधून साखरेची वाहतूक होऊ देणार नाही.

ऊस परिषदेतील ठराव- ज्या कारखान्यांनी गतवर्षीची एफआरपी दिलेली नाही. त्या साखर कारखान्यांच्या संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.- लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले विनाअट माफ करावीत.- जागतिक स्तरावर कार्बन क्रेडीटच्या धर्तीवर आपत्ती निवारण निधीची निर्मिती करावी.- केंद्र सरकारने साखरेची विक्री किंमत ३५ रुपये करावी.- सन २०२०-२१ वषार्करीता साखरेचे निर्यात अनुदान प्रतिक्विंटल १५०० रुपये करुन ७५ लाख टन साखर निर्यातीस परवानगी द्यावी.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSugar factoryसाखर कारखाने