शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महायुती, महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीसंबंधी चर्चेलाही येऊ नये : राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 12:06 IST

कोल्हापूर : राज्यात स्वाभिमानीची ताकद असलेल्या कोल्हापूर , हातकणंगले, सांगली, माढा, बुलढाणा, परभणी हे सहा लोकसभा मतदारसंघ लढवणार आहे. ...

कोल्हापूर : राज्यात स्वाभिमानीची ताकद असलेल्या कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, माढा, बुलढाणा, परभणी हे सहा लोकसभा मतदारसंघ लढवणार आहे. आम्ही स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय अडीच वर्षांपूर्वीच घेतला आहे. त्या दिशेने वाटचालही सुरू आहे. त्यामुळे यापुढे लोकसभा निवडणुकीसंबंधी चर्चा करण्यासाठीसुद्धा महायुती, महाविकास आघाडीने आमच्याकडे येऊ नये, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी माध्यमांसमोर बोलताना मांडली.

सर्वच पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधल्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात जागा लढवण्याची वल्गना आम्ही करणार नाही. मात्र, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे जाळे, संच असलेल्या हातकणंगलेसह सहा मतदारसंघ लढवणार आहे.

भाजपने अनेक पक्ष फोडले. शेतकरीविरोधी अनेक निर्णय घेतले आहेत. राजकारणात लोकप्रतिनिधींचा घाऊक घोडेबाजार केला. यामुळे मतदारांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यांना वाट मोकळी करून देण्यासाठी सहा मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे. यापूर्वीच आम्ही लोकसभा निवडणुकीसंबंधीची राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार महायुक्ती, महाविकास आघाडीसोबत न जाता स्वतंत्रपणे सहा जागा लढवणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टी