कोल्हापूर: लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले तातडीने माफ करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी पंचगंगा पुलावर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची मंगळवारी बैठक झाली. लॉकडाऊनची भीती घालून आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा राज्यभर तीव्र पडसाद उमटतील, असा इशाराही दिला. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पुलावर ‘चक्का जाम आंदोलन’ करण्यात येणार असून सर्वपक्षियांनी यामध्ये सामील व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेश प्रा. डॉ. जालंधर पाटील, सावकर मादनाईक, आदिनाथ हेमगिरे, जनार्दन पाटील, वैभव कांबळे, संदीप कारंडे, विठ्ठल मोरे, शैलेश आडके, रमेश भोजकर, अविनाश मगदूम, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.