शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: 'स्वाभिमानी'चे नेते सावकर मादनाईक भाजपच्या वाटेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 16:23 IST

शिरोळमध्ये राजकीय भूकंप होण्याचे संकेत

जयसिंगपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकर मादनाईक भाजपच्या वाटेवर आहेत. विधानसभा निवडणुकीपासून त्यांची भाजपशी जवळीक वाढली आहे. चळवळीतील नेता म्हणून त्यांची ओळख असून भविष्यात शिरोळ तालुक्यात तगड्या उमेदीचा कार्यकर्ता भाजपला हवा असेल तर मादनाईक यांना बळ दिले पाहिजे, हे ओळखून त्यांना भाजपमध्ये घेऊन पक्ष मजबूत करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. त्यामुळे लवकरच मादनाईक हे भाजपचा झेंडा घेण्याची शक्यता आहे.स्वाभिमानीचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यानंतर पहिल्या फळीतील कार्यकर्ता म्हणून मादनाईक यांनी आपली ओळख निर्माण केली होती. स्वाभिमानीची अनेक आंदोलने उभारून त्यांनी यशस्वी केली. दोन वेळा विधानसभा निवडणुकीला त्यांना पराभव पत्करावा लागला. जनतेने घेतलेला निर्णय मान्य करीत त्यांनी चळवळ कायम ठेवली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांचे विचार आणि निर्णय पटत नसल्याच्या कारणातून सवतासुभा मांडला. आपण सर्वांनी मिळून मादनाईक यांना आमदार करूया, अशी भूमिका माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी मांडली होती. यानिमित्ताने मादनाईक यांना महायुतीच्या नेत्यांनी नेमका कोणता शब्द दिला आहे, ही चर्चा ताजी असतानाच मादनाईक हे भाजपमध्ये जाण्याचे संकेत मिळत आहेत. लवकरच कळेल..भाजप प्रवेशाबाबत सावकर मादनाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लवकरच नक्की काय ते कळेल, अशी प्रतिक्रिया दिली.