शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, कुरुंदवाडमध्ये कारखाना कार्यालयास ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 12:38 IST

उसाची पहिली उचल केवळ २३00 रुपयेच जमा केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन तीव्र केले असून कुरूंदवाड येथील साखर कारखान्याच्या गेटकेन कार्यालयास स्वाभिमानीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी शनिवारी टाळे ठोकले.

ठळक मुद्देस्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमककुरुंदवाडमध्ये कारखाना कार्यालयास ठोकले टाळे

कुरुंदवाड/कोल्हापूर : उसाची पहिली उचल केवळ २३00 रुपयेच जमा केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन तीव्र केले असून कुरूंदवाड येथील साखर कारखान्याच्या गेटकेन कार्यालयास स्वाभिमानीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी शनिवारी टाळे ठोकले.साखर कारखान्यांनी पहिली उचल २३00 रुपये दिल्याच्या निषेधार्थ संतप्त स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी कुरुंदवाडमधील सर्वच साखर कारखान्यांच्या विभागीय कार्यालयांना टाळे ठोकून आंदोलन केले. यावेळी आंदोलक कार्यकर्ते आणि कार्यालयातील कर्मचारी यांच्यात वादावादी झाल्यामुळे काहीकाळ त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.साखर कारखाने सुरू होऊन दोन महिने झाले तरीही अद्याप एकाही साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम जमा केली नव्हती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या एफआरपीमध्ये मोडतोड केल्यास तीव्र आंदोलन करू असा गर्भित इशारा दिला होता.कोल्हापूर जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर २३00 रुपये वर्ग केल्याचे समजताच शेतकरी वर्गात तीव्र संतापाची तीव्र लाट उसळली आहे. याचाच परिणाम म्हणून आज कुरूंदवाड येथील साखर कारखान्यांच्या गेटकेन कार्यालयाला कार्यकर्त्यांनी टाळे ठोकून आंदोलन सुरु केले आहे.दरम्यान, आजच कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची नांदणी येथे तातडीची बैठक बोलावून पुढे आंदोलनाची दिशा ठरणार असून खासदार राजू शेट्टी या बैठकीस मार्गदर्शन करणार आहेत. स्वाभिमानीची ताकद दाखवून देऊ असा इशाराही शेट्टी यांनी यावेळी दिला आहे. 

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाkolhapurकोल्हापूर