शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'स्वाभिमानी'चे कार्यकर्ते आक्रमक; डी वाय पाटील, फराळे कारखान्याच्या ऊस तोडी पाडल्या बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 16:53 IST

श्रीकांत ऱ्हायकर धामोड: ऊस दराच्या गतसालच्या हप्त्यावरून धामोड परिसरातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी आज, शनिवारी संपूर्ण ...

श्रीकांत ऱ्हायकरधामोड: ऊस दराच्या गतसालच्या हप्त्यावरून धामोड परिसरातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी आज, शनिवारी संपूर्ण तुळशी-धामणी परिसरात मोटरसायकल रॅली काढून परिसरातील कारखान्यांच्या गट कार्यालयांना निवेदन देत काही कारखान्यांच्या सुरू असलेल्या ऊस तोडी बंद पडल्या. मोटरसायकल रॅलीमध्ये शेकडो तरुण सहभागी झाले होते. ऊसतोड सुरू असलेल्या ठिकाणी तरुणांचा आक्रमक पवित्रा बघून ऊसतोड कामगारांनी फडातून काढता पाय घेतला.गतसालच्या उसाच्या हप्त्याची दुसरी रक्कम चारशे रुपये खात्यावर त्वरित जमा करा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आक्रोश पदयात्रा काढत कारखानदारांची चांगलीच कोंडी केली आहे. ऊस परिषदेतही दुसऱ्या हप्त्याशिवाय कोयता लावू न देण्याचा इशारा दिला आहे. यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांच्या ऊस तोडी बंदच आहेत. पण तुळशी धामणी परिसरातील डी. वाय. पाटील साखर कारखाना व ओंकार शुगर फराळेच्या काही तोडी सुरू असल्याचे संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजताच मोटसायकल रॅलीने घटनास्थळी जात ऊसतोडी बंद पाडल्या.तसेच कारखान्यांच्या गट ऑफीसशी संपर्क साधून कार्यालय तात्काळ बंद करावे अशा आशयाचे निवेदन दिले. मागणी पूर्ण होईपर्यंत गट कार्यालय बंद ठेवून सहकार्य करावे अशी विनंतीही केली. यावेळी संघटनेचे विभाग प्रमुख आर डी कुरणे, महादेव पाटील, राधानगरीचे युवा अध्यक्ष कुमार कुरणे, पांडुरंग कुरणे, तुकाराम दळवी, विठ्ठल लव्हटे, अनिल तेली, संदिप फडके, शंकर पाटील, एकनाथ जांभळे, विशाल चौगले यांच्यासह तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते

टॅग्स :kolhapurकोल्हापूर