शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील वडणगेत दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू, आयुर्वेदिक औषध सेवनानंतर रिॲक्शन आल्याचा कुटुंबीयांचा दावा

By उद्धव गोडसे | Updated: May 31, 2023 13:36 IST

पती-पत्नीच्या संशयास्पद मृत्यूमुळे परिसरात उडाली खळबळ

कोल्हापूर : वडणगे (ता. करवीर) येथील मधुकर दिनकर कदम (वय ५९) आणि जयश्री मधुकर कदम (४९, दोघे रा. दिंडे कॉलनी, वडणगे) यांचा बुधवारी (दि. ३१) सकाळी संशयास्पद मृत्यू झाला. मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध घेतल्यानंतर काही वेळातच रिॲक्शन आल्याने दोघांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज कदम दाम्पत्याच्या मुलींनी वर्तवला आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी दोघांचा व्हिसेरा राखीव ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली.सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे शिवाजी पेठेतील मधुकर कदम हे त्यांची पत्नी आणि दोन मुलींसह वर्षभरापूर्वीच वडणगे येथील नवीन घरात राहायला गेले होते. एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झालेले कदम यांना मधुमेहाचा त्रास सुरू होता. त्यांची पत्नी जयश्री यांनाही काही दिवसांपासून मधुमेहाचा त्रास सुरू होता.दोघांनी १५ दिवसांपूर्वीच मुक्त सैनिक वसाहत परिसरातील एका डॉक्टरकडून आयुर्वेदिक औषध घेतले होते. बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास दोघांनीही औषधी पावडर पाण्यात मिसळून प्राशन केली. त्यानंतर मधुकर कदम हे दूध आणण्यासाठी बाहेर गेले, तर जयश्री या स्वयंपाक करत होत्या. काही वेळातच जयश्री यांना अस्वस्थ वाटू लागले. श्वासोच्छवासास त्रास होऊ लागला. सुमारे २० मिनिटांनी त्या बेशुद्ध पडल्या.दरम्यान, दूध आणण्यासाठी गेलेलेे मधुकर कदमही दूध डेअरीजवळच्या चौकात चक्कार येऊन पडल्याचे नागरिकांना आढळले. परिसरातील नागरिकांनी तातडीने कदम दाम्पत्यास शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, बाहेरच तपासणी करून त्यांनी रुग्णांना सीपीआरमध्ये पाठवले. सीपीआरमधील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कदम दाम्पत्याच्या दोन्ही मुलींना धक्का बसला. पती-पत्नीच्या संशयास्पद मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृत दाम्पत्याच्या पश्चात गायत्री (वय १९) आणि विजया (१७) दोन मुली आहेत. व्हिसेरा राखीवकदम दाम्पत्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी सीपीआरमधील डॉक्टरांनी व्हिसेरा राखीव ठेवला आहे. शवचिकित्सा आणि व्हिसेराचा अहवाल येताच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यूmedicineऔषधं