शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
2
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
5
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
6
साप्ताहिक राशीभविष्य: २ राजयोगांचा ९ राशींना दुपटीने लाभ, सुबत्ता-भरभराट; गुंतवणुकीत नफा!
7
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार
8
मुख्याध्यापक वर्गातच झिंगून वर्गातच झोपले; खिशात देशी दारूची आणखी एक बाटली भरलेली... 
9
आयुष्याचा शेवट ठरला Live स्टंट...फिल्म शुटींगवेळी स्टंटमॅनचा जागीच मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ समोर
10
Share Market: सेन्सेक्स २०० अंकांनी आपटला; निफ्टीमध्येही घसरण, अनेक दिग्गज शेअर्सचं लोटांगण
11
पतीला घटस्फोट देणाऱ्या सायना नेहवालकडे किती संपत्ती आहे? आकडा ऐकून थक्क व्हाल!
12
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
13
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
14
पती-पत्नी असल्याचं सांगून हॉटेलमध्ये रूम बुक केली, आत जाताच तरुणाने तरुणीवर गोळी झाडली अन्... 
15
शासकीय सेवेतील तब्बल तीन लाख पदे रिक्त !, ५,२८९ कर्मचारी नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणार
16
कारमध्ये शिवसेनेचा झेंडा, एक्सप्रेस वेवर रॅश ड्रायव्हिंग; आस्ताद काळे भडकला, म्हणाला- "माझ्या गाडीला कट मारुन..."
17
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
18
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
19
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
20
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 

‘एव्हीएच’ला १२ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती

By admin | Updated: February 6, 2015 00:42 IST

कंपनीचे अधिकारी गैरहजर : पर्यावरणमंत्र्यांचा निषेध

चंदगड : पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे हलकर्णी औद्योगिक वसाहतीमध्ये गट नं. ५२ मध्ये सुरू असलेला एव्हीएच प्रकल्प आरोग्यास घातक असल्याने या प्रकल्पातून उत्पादन करणे अथवा कच्चा माल आणून त्याची वाहतूक करण्यास किंवा साठा करण्यास प्रांताधिकारी कुणाल खेमणार यांनी १२ फेब्रुवारीपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १३९ प्रमाणे बंदी आदेश दिला आहे.चंदगड येथे पंचायत समितीच्या पारगड सभागृहात आमदार संध्यादेवी कुपेकर, एव्हीएचविरोधी कृती समिती व एमआयडीसी अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी खेमणार यांनी हा बंदी आदेश एव्हीएच कंपनीला लागू केला. या बैठकीत एमआयडीसीचे अधिकारी अनुपस्थित होते. तहसील कार्यालयाबाहेर आंदोलकांनी एव्हीएच विरोधी घोषणा देऊन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला.यावेळी डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी ज्याठिकाणी एव्हीएच प्रकल्प उभा राहिला आहे, त्या परिसरात दोन राखीव जंगले, २४ लघू पाटबंधारे तलाव, आठ कि. मी. परिसरात तीन नद्या आहेत. तसेच पश्चिम घाटातील हा संवेदनशील भाग असून, पर्यावरण खात्याने डोळेझाक केल्याने कंपनीने पर्यावरणाचे नियम बदलून आपल्यासारखे केले आहेत. त्यामुळे केंद्रीय समितीकडून या प्रकल्पाची पाहणी करून हा प्रकल्प ‘ए’ ग्रेडमध्ये घ्यावा. तोपर्यंत कंपनीच्या उत्पादनास स्थगिती द्या, अशी मागणी केली.जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील यांनी एव्हीएच कंपनीचे टँकर ग्रामपंचायत हद्दीतून सोडणार नसल्याचे सांगितले, तर अ‍ॅड. संतोष मळवीकर यांनी यावेळी कठोर भूमिका घेत उत्पादनावर बंदी आणण्याची मागणी केली. यावेळी प्रा. एन. एस. पाटील, एम. जे. पाटील, रामराजे कुपेकर, तहसीलदार आप्पासाहेब समिंदर, जिल्हा परिषद सदस्य तात्यासाहेब देसाई, सुजाता पाटील, नंदिनी पाटील, तानाजी गडकरी, विष्णू गावडे, गणेश फाटक, उपप्रादेशिक अधिकारी मनीष हावळ, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)माजी आमदार नरसिंगराव पाटील म्हणाले, या औद्योगिक वसाहतीत स्थानिकांना उद्योगधंद्यासाठी १-१ गुंठा जागेची मागणी केली होती. मात्र, एमआयडीसीने दिली नाही; पण या कंपनीला एकदम ८५ एकर जमीन कशी दिली याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी केली.