शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे खून खटला: संशयित डॉ. वीरेंद्र तावडे याचा जामीन रद्द

By उद्धव गोडसे | Updated: July 16, 2024 13:13 IST

तावडे याला ताब्यात घेण्याचा एटीएसला आदेश, जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणी संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याचा जामीन जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) एस. एस. तांबे यांनी रद्द केला. तावडे याला तातडीने ताब्यात घ्यावे असा आदेश न्यायाधीश तांबे यांनी दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) दिला आहे. मंगळवारी (दि. १६) झालेल्या सुनावणीत हा निर्णय देण्यात आला.विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणात डॉ. वीरेंद्र तावडे याचा सहभाग असल्याचे पुरावे विशेष तपास पथकाला (एसआयटी) मिळाले होते. तेव्हा संशयित तावडे हा डॉ. नरेेंद्र दाभोळकर यांच्या खूनप्रकरणी सीबीआयच्या अटकेत होता. एसआयटीने सप्टेंबर २०१६ मध्ये सीबीआयकडून तावडे याचा ताबा घेतला. पानसरे यांच्या खुनाचा कट रचण्यापासून हल्लेखोरांना प्रशिक्षण देणे, त्यांना शस्त्रे आणि वाहनांची उपलब्धता करून देणे, राहण्याची व्यवस्था करण्याचे काम तावडे याने केल्याचा दावा पोलिसांनी केला होता. दरम्यान, तावडे याच्या वकिलांनी जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. 

त्यानुसार त्याला जानेवारी २०१८ मध्ये जामीन मंजूर झाला होता. यावर आक्षेप घेत विशेष सरकारी वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित प्रकरण जिल्हा न्यायालयात चालवून त्यावर निर्णय व्हावा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार विशेष सरकारी वकिलांनी डॉ. तावडे याचा जामीन रद्द करण्याची विनंती जिल्हा न्यायालयाकडे केली होती.

विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर आणि शिवाजीराव राणे यांचा युक्तीवाद आणि बचाव पक्षाचा युक्तीवाद ऐकूण अखेर न्यायाधीश तांबे यांनी संशयित तावडे याचा जामीन रद्द केला. तसेच त्याला तातडीने ताब्यात घेण्याचा आदेश एटीएसला दिला आहे. यावेळी बचाव पक्षाचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर उपस्थित होते.

तावडे जामिनावर बाहेरपानसरे खूनप्रकरणी जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर तावडे याची डॉ. दाभोळकर खून खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली होती. त्यामुळे बचाव पक्षाने त्याची जामिनावर सुटका करण्याची विनंती न्यायालयात केली. त्यानुसार गेल्या तीन महिन्यांपासून तावडे याची सुटका झाली होती. मात्र, जामीन रद्द झाल्यामुळे त्याला आता पुन्हा कोठडीत जावे लागणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovind Pansareगोविंद पानसरेCourtन्यायालय