शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या फेरमतमोजणीत सुशांत शेलार विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 13:24 IST

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीतील फेरमतमोजणीत अभिनेता गटात सुशांत शेलार विजयी झाले. त्यांनी माजी अध्यक्ष विजय पाटकर यांचा १६ मतांनी पराभव केला. शेलार यांना ५९१ मते, तर विजय पाटकर यांना ५७३ मते पडली. या निर्णयाकडे सर्व चित्रपट व्यावसायिकांचे लक्ष लागून राहिले होते.

ठळक मुद्देचित्रपट महामंडळाच्या फेरमतमोजणीत सुशांत शेलार विजयीअडीच वर्षांनी झाला निर्णय : विजय पाटकर यांचा १६ मतांनी पराभव

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीतील फेरमतमोजणीत अभिनेता गटात सुशांत शेलार विजयी झाले. त्यांनी माजी अध्यक्ष विजय पाटकर यांचा १६ मतांनी पराभव केला. शेलार यांना ५९१ मते, तर विजय पाटकर यांना ५७३ मते पडली. या निर्णयाकडे सर्व चित्रपट व्यावसायिकांचे लक्ष लागून राहिले होते.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची एप्रिल २०१६ मध्ये निवडणूक झाली होती. त्यामध्ये मेघराज राजेभोसले, सतीश रणदिवे यांच्या समर्थ पॅनेलने १४ पैकी १२ जागांवर विजय मिळविला होता. अभिनेता गटामध्ये विजय पाटकर १८ मतांनी विजयी झाले होते.

यावेळी मतमोजणी प्रक्रियेबद्दल अभिनेते शेलार यांनी हरकत घेत धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे फेरमतमोजणीची मागणी केली होती; पण ती मागणी कार्यालयाने फेटाळून लावल्याने त्यावर शेलार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशाने सोमवारी चित्रपट महामंडळाच्या कार्यालयात फेरमतमोजणी झाली.

निवडणूक अधिकारी म्हणून धर्मादाय अधीक्षक शिवराज नाईकवडे, निरीक्षक आसिफ शेख आणि एम. के. नाईक यांच्या यांनी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत फेरमतमोजणी केली.तब्बल अडीच वर्षांनी झालेल्या या फेरमतमोजणीत शेलार यांना ५९१, तर पाटकर यांना ५७५ मते मिळाली. त्यामुळे शेलार हे १६ मतांनी विजयी झाले, तर पराभव झाल्याने पाटकर यांचे संचालकपद रद्द झाले आहे.

उच्च न्यायालयाकडून फेरमतमोजणी निकालाची प्रत अथवा अहवाल प्राप्त झाल्यावर महामंडळाकडून शेलार यांच्या विजयाची घोषणा करण्यात येणार आहे.

यावेळी महामंडळ अध्यक्ष मेघराज राजेभोसले, उपाध्यक्ष धनाजी यमकर, कार्यवाह रणजित जाधव, अरुण भोसले, सतीश चव्हाण, सुरेंद्र पन्हाळकर, आकाराम पाटील, सतीश बिडकर, रोहन स्वामी, रवींद्र बोरगावकर उपस्थित होते. 

गेल्या अडीच वर्षांपासून न्यायासाठी मी लढत होतो आज तो मिळाला. उरलेल्या पावणेतीन वर्षांत सभासदांच्या भल्याचे निर्णय कसे घेता येतील, यावर अधिक भर असेल.- सुशांत शेलार, अभिनेते

फेरमतमोजणीत माझा पराभव झाला असला तरी तो मला मान्य आहे. पुढील काळातही एक सभासद या नात्याने मी चांगली भूमिका पार पाडेन. संचालक मंडळाच्या चांगल्या निर्णयाच्या मागे सदैव राहीन.- विजय पाटकर, अभिनेते

 

 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर