आयुक्तांची वर्कशॉपला अचानक भेट : कर्मचाऱ्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 01:32 PM2020-05-11T13:32:37+5:302020-05-11T13:33:45+5:30

पूर्ण करण्याच्या सूचना मुख्य आरोग्य निरीक्षक जयंत पोवार यांना दिल्या. यामध्ये कर्मचाऱ्यांमार्फत ४७५ लहान नाले, जेसीबीच्या साहाय्याने २३६ मध्यम नाले व चॅनल सफाई तसेच जयंती, गोमती, दुधाळी व शाम सोसायटी नाला येथे पोकलॅन मशीनच्या साहाय्याने गाळ काढण्याचे काम सुरू आहे.

A surprise visit to the Commissioner's workshop | आयुक्तांची वर्कशॉपला अचानक भेट : कर्मचाऱ्यांची धावपळ

आयुक्तांची वर्कशॉपला अचानक भेट : कर्मचाऱ्यांची धावपळ

Next
ठळक मुद्दे नालेसफाईची मशिनरी तत्काळ उपलब्ध करण्याचे आदेश

कोल्हापूर : सुभाष स्टोअर्स येथील वर्कशॉपमध्ये आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी रविवारी अचानक भेट दिली. यामुळे कर्मचाऱ्यांची धावपळ झाली. मान्सूनपूर्व आवश्यक त्या मशिनरीच्या तयारीची त्यांनी पाहणी केली. सध्या नालेसफाईसाठी असणारे जेसीबी व पोकलॅन मशीन दोन शिफ्टमध्ये उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. यासाठी वर्कशॉप विभागाने प्राधान्याने नालेसफाई, कचरासफाई व पाणीपुरवठा विभागांना प्राधान्य देऊन मशिनरी उपलब्ध करून देण्याचे आदेश वर्कशॉप प्रमुख चेतन शिंदे यांना दिले.

शहरामध्ये महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पोकलॅन, जेसीबीच्या व कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने नालेसफाई करण्यात येते. यावर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नालेसफाई करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. याबाबत आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सुभाष स्टोअर येथे वर्कशॉपला अचानक भेट देऊन मशिनरीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामाची माहिती घेतली.
मे अखेर नालेसफाईचे काम करा

आयुक्तांनी दसरा चौक, सुतारवाडा येथील नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. यावेळी ही कामे मे महिन्याअखेर पूर्ण करण्याच्या सूचना मुख्य आरोग्य निरीक्षक जयंत पोवार यांना दिल्या. यामध्ये कर्मचाऱ्यांमार्फत ४७५ लहान नाले, जेसीबीच्या साहाय्याने २३६ मध्यम नाले व चॅनल सफाई तसेच जयंती, गोमती, दुधाळी व शाम सोसायटी नाला येथे पोकलॅन मशीनच्या साहाय्याने गाळ काढण्याचे काम सुरू आहे.

Web Title: A surprise visit to the Commissioner's workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.