शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सूरमंजिरी लाटकर यांना सहा महिने महापौरपद?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 14:56 IST

विधानसभा निवडणुकीत नेत्यांच्या आदेशानुसार कॉँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राबल्याचे फळ म्हणून ‘राष्ट्रवादी’च्या नगरसेविका अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर यांची लवकरच महापौरपदी वर्णी लागणार असून, त्यांना सहा महिन्यांचा कालावधी देण्यात येणार आहे. याबाबत आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्यात चर्चा होऊन तसा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसूरमंजिरी लाटकर यांना सहा महिने महापौरपद?आ. मुश्रीफ -आ. पाटील यांच्या चर्चेनंतर निर्णय

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत नेत्यांच्या आदेशानुसार कॉँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राबल्याचे फळ म्हणून ‘राष्ट्रवादी’च्या नगरसेविका अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर यांची लवकरच महापौरपदी वर्णी लागणार असून, त्यांना सहा महिन्यांचा कालावधी देण्यात येणार आहे. याबाबत आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्यात चर्चा होऊन तसा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.कोल्हापूर महापालिकेत महापौरपदाचा कालावधी अडीच वर्षांचा, तर स्थायी समिती सभापतिपदाचा कालावधी एक वर्षाचा असतो; परंतु ही पदे महत्त्वाची असल्यामुळे त्यासाठी दोन्ही कॉँग्रेसकडून इच्छुकांची संख्या जास्त झाली.

सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करायची तर पदाची खांडोळी करण्याशिवाय आघाडी नेत्यांकडे पर्याय राहिलेला नाही; त्यामुळे महापौरपदाचा कालावधी सहा महिने असा ठरवून दिला. इच्छुकांची संख्या लक्षात घेता तीन महिन्यांपर्यंत हा कालावधी खाली आणला गेला.

राष्ट्रवादी कॉँग्रेसने सरिता मोरे यांना सहा महिन्यांकरिता महापौर केले. त्यानंतर सूरमंजिरी लाटकर यांना महापौर करण्याचे ठरले; मात्र राष्ट्रवादीअंतर्गत वादामुळे अनपेक्षित माधवी गवंडी यांना महापौरपद मिळाले. त्यांना तीन महिन्यांसाठी ते देण्यात आले होते.

उर्वरित तीन महिने लाटकर यांना संधी देण्याचे ठरले; परंतु गवंडी यांचा कालावधी संपत आला असताना विधानसभा निवडणूक लागली आणि महापौर निवडणूक घेण्यावर राज्य सरकारनेच निर्बंध आणले; त्यामुळे त्यांना आणखी दीड महिना संधी मिळाली.आता सूरमंजिरी लाटकर यांना महापौर करायचे झाले तर कालावधी केवळ दीड दोन महिन्यांचाच मिळेल. तसे झाले तर तो त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल, म्हणून त्यांना किमान सहा महिने तरी संधी मिळावी, असा मतप्रवाह राष्ट्रवादीत आहे. यापुढे महापौरपदाचा बरोबर एक वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. त्यातील कॉँग्रेसने मोठे मन दाखवून लाटकरांनी सहा महिने संधी द्यावी म्हणून प्रस्ताव पुढे आणला आहे.

सूरमंजिरी यांचे पती राजेश लाटकर यांनी विधानसभा निवडणुकीत नेत्यांच्या आदेशानुसार कोल्हापूर उत्तर व दक्षिण मतदारसंघात चांगले काम केले. त्याचेच फळ म्हणून कॉँग्रेसकडून तशी संधी दिली जाईल, असे दिसते.फोडाफोडीच्या राजकारणाची शक्यताविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय संदर्भ बरेच बदलले आहेत. राष्ट्रवादीमधील काही नगरसेवकांनी पक्षाविरोधात प्रचार केला, तर भाजप-ताराराणीमधील काही नगरसेवकांनी कॉँग्रेसचा प्रचार केला आहे.

शिवसेना सदस्य यावेळी कॉँग्रेसची साथ सोडण्याची शक्यता आहे; त्यामुळे महापौर निवडणुकीत फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपने अशा राजकारणास हात घातला तर कॉँग्रेस-राष्ट्रवादीनेही जशास तसे उत्तर देण्याची तयारी ठेवली आहे. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर