कोल्हापूर : रागातून सावरून चिंतेच्या खाईत लोटलेल्या ३० वर्षीय जॉन कॉलिवर या ब्रिटिश तरुणावर कोल्हापुरातील वेस्टर्न इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ न्यूरोसायन्सेस (विन्स) मध्ये ‘कॅप्सुलॉटॉमी’शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आहे़ न्यूरोनेव्हीगेशन तंत्राच्या साहाय्याने मानसिक रुग्णांवर अशा प्रकारची शस्त्रक्रिया करणारे ‘विन्स’ हे भारतातील पहिले हॉस्पिटल असल्याचा दावा प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ़ संतोष प्रभू यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी केला़ डॉ़ प्रभू म्हणाले, कॉलिवर हा तरुण गेल्या बारा वर्षांपासून दुर्धर मानसिक आजाराने त्रस्त आहे. इंग्लंडमधील मानसोपचार तज्ज्ञांनी या आजारातून मुक्त होण्यासाठी शस्त्रक्रिया हाच पर्याय असल्याचे सांगितले़ इंटरनेटच्या माध्यमातून ‘विन्स’मध्ये अशा शस्त्रक्रिया होत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. कॅप्सुलॉटॉमी या शस्त्रक्रियेत चिंता निर्माण करणाऱ्या मेंदूतील तंतंूचा न्यूरोनेव्हीगेशन तंत्राच्या मदतीने शोध घेऊन त्या नष्ट केल्या जातात.मागील वर्षी विन्समध्ये जॉन याच्यावर अनावर राग, फोबिया यांच्यापासून मुक्त करणारी शस्त्रक्रिया रेडिओ फ्रिक्वेन्सी लीजन्स व न्यूरोनेव्हीगेशन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केली होती़ यावेळी डॉ़ सुजाता प्रभू, सागर जांबिलकर उपस्थित होते. मानसिक रोगाशी संबंधित गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया न्यूरोनेव्हीगेशन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जगभरात केवळ सहा ते सात ठिकाणीच केल्या जातात़ विन्स हॉस्पिटल हे त्यांपैकी एक आहे़- डॉ. संतोष प्रभू, प्रख्यात न्यूरोसर्जन, कोल्हापूरआय फील व्हेरी हॅपी! मी लंडनमध्ये राहत असून, फार्मसीचे शिक्षण घेतले आहे़;पण विन्समध्ये झालेल्या दोन शस्त्रक्रियांनंतर मला खूप बरे वाटत असून, मी आनंदी आहे़ अद्यापही लग्न झालेले नाही़ आता लंडनला गेल्यानंतर फार्मासिस्ट म्हणून काम करण्याचा माझा मानस आहे, अशी माहिती यावेळी जॉन कॉलिवरने दिली़
मानसिक रोगावर ‘विन्स’मध्ये शस्त्रक्रिया
By admin | Updated: July 3, 2015 00:48 IST