शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सुरेश हाळवणकर अखेर पात्र

By admin | Updated: September 30, 2014 01:06 IST

इचलकरंजी विधानसभा : १७ अर्ज वैध; भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

  इचलकरंजी : येथील भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांच्या वीज चोरी प्रकरणातील शिक्षा व दोषित्वाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने विधानसभा निवडणुकीची त्यांची उमेदवारी वैध ठरविण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी जिरंगे यांनी दिला. उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर इचलकरंजी विधानसभा निवडणूक रिंगणात राष्ट्रीय कॉँग्रेसचे प्रकाश आवाडे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे मदन कारंडे, माकपचे सदाशिव मलाबादे, शिवसेनेचे मुरलीधर जाधव यांच्यासह १७ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण १९ उमेदवारांनी ३० अर्ज दाखल केले होते. या अर्जांची छाननी येथील प्रांताधिकारी कार्यालयात आज, सोमवारी सकाळी अकरा वाजता सुरू झाली. त्यावेळी आमदार हाळवणकर यांच्या अर्जावर मलाबादे व बालमुकुंद व्हनुंगरे यांनी हरकत घेतली. वीज चोरी प्रकरणात हाळवणकर यांना दोन वर्षांहून अधिक शिक्षा झाल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरवावा, अशा आशयाच्या दोन्ही हरकती होत्या. या हरकतीसंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी जिरंगे यांच्यासमोर सुमारे तीन तास सुनावणी चालली. मलाबादेंच्या वतीने अ‍ॅड. जयंत बलुगडे, व्हनुंगरे यांच्यावतीने अ‍ॅड. कोलगुट, अ‍ॅड. स्वानंद कुलकर्णी, तर आमदार हाळवणकर यांच्यावतीने अ‍ॅड. गणेश सोवनी, अ‍ॅड. सुहास मुदगल व अ‍ॅड. भरत जोशी यांनी युक्तिवाद केला. अ‍ॅड. सोवनी म्हणाले, वीज चोरी प्रकरणात आमदार हाळवणकर यांना दोषी ठरवून न्यायालयाने तीन वर्षांचा तुरुंगवास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली असली तरी त्यावर उच्च न्यायालयाने ११ जूनला शिक्षेला आणि २१ जुलैला दोषित्वाला स्थगिती दिली आहे. तसेच १९ सप्टेंबरला निवडणूक आयोगाने दिलेल्या पत्रात, एखाद्या लोकप्रतिनिधीचे कोणत्याही गुन्ह्यातील दोषित्वाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असेल, तर त्या लोकप्रतिनिधीला निवडणुकीसाठी उभे राहता येईल, असे स्पष्ट केले आहे. हाळवणकर यांच्यावतीने अ‍ॅड. सोवनी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून हाळवणकर यांच्या विरोधात देण्यात आलेल्या दोन्ही हरकती फेटाळल्या असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जिरंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आमदार हाळवणकर यांना वीज चोरीप्रकरणी दोषी ठरवून ३ मे रोजी विशेष न्यायालयाने निकाल दिला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निकाल लागल्याने हाळवणकर यांना निवडणुकीसाठी उभे राहता येणार की नाही, याबाबत गेले पाच महिने राजकीय क्षेत्रात उलट-सुलट चर्चा होती. त्यामुळे हाळवणकर यांच्या उमेदवारी अर्जाबाबत मोठी उत्सुकता लागून राहिली होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून दिला जाणारा निकाल ऐकण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयावर मोठी गर्दी झाली होती. निकाल लागताच आमदार समर्थक कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आणि फटाक्यांची आतषबाजी केली. (प्रतिनिधी)