शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
3
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
4
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
5
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
6
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
7
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
8
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
9
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
10
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
11
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
12
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
13
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
14
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
15
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
16
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
17
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
18
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
19
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
20
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...

शिवाजी विद्यापीठ निवडणूक: ‘सिनेट’चा पहिला निकाल जाहीर, पदव्युत्तर शिक्षक गटात ‘सुप्टा’ची बाजी

By संतोष.मिठारी | Updated: November 16, 2022 14:06 IST

विद्यापीठ विकास आघाडी आणि विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) यांच्यात चुरस

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) आणि विद्यापरिषद, अभ्यासमंडळे, आदी अधिकार मंडळांच्या निवडणुकीतील मतमोजणी प्रक्रिया आज, बुधवार सकाळी नऊ वाजता विद्यापीठातील परीक्षा भवन क्रमांक दोनमध्ये सुरू झाली. पहिल्यांदा मतदारसंख्या कमी असलेल्या विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षक गटातील मतमोजणी पूर्ण झाली. यात शिवाजी विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षक संघटनेच्या (सुप्टा) उमेदवारांनी तीन जागांवर बाजी मारली.विजयी उमेदवारांमध्ये डॉ. शशीभूषण महाडिक (संख्याशास्त्र), शंकर हंगीरगेकर (रसायनशास्त्र), माधुरी वाळवेकर (प्राणीशास्त्र) यांचा समावेश आहे. या उमेदवारांनी विजयानंतर विद्यापीठ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.विविध नऊ अभ्यास मंडळांवरील २७ जागांसाठी ४६ उमेदवारांमध्ये लढत झाली. त्यात विद्यापीठ विकास आघाडी आणि विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) यांच्यात चुरस रंगली. विकास आघाडीने १४ जागांसह बाजी मारली. ‘सुटा’ला १३ जागा मिळाल्या. विकास आघाडीला इंग्रजी, हिंदी अभ्यासमंडळात प्रत्येकी एक, मानसशास्त्रमध्ये तीन तर ‘सुटा’ला हिंदी इंग्रजी, रसायनशास्त्र, व्यावसायिक अर्थशास्त्र, प्राणीशास्त्रमध्ये दोन आणि अर्थशास्त्रमध्ये १ जागा मिळाली. अभ्यासमंडळाच्या गटानंतर आता अधिसभा-शिक्षक, विद्यापरिषद शिक्षक, नोंदणीकृत पदवीधर या गटांतील मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठElectionनिवडणूक