शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विधवा प्रथा बंदबाबत कायद्यात रूपांतर होण्यासाठी पुढाकार घेणार - सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 10:39 IST

Supriya Sule : हेरवाड (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीने विधवा महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी विधवा प्रथा बंद करण्याचा ग्रामसभेत ठराव केला आहे. या ठरावाची माहिती घेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी हेरवाड सरपंच सुरगोंडा पाटील, ग्रामसेवक, महिला सदस्या यांना सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या सभागृहात बोलावून घेतले.

कुरुंदवाड : विधवा महिलांना समाजात सन्मानाची वागणूक देण्याबाबत हेरवाड ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराला चालना देणारा हा निर्णय राजर्षी शाहू महाराजांच्या जिल्ह्यातून होत आहे याचा अभिमान आहे. या ठरावाचे कायद्यात रूपांतर करून या निर्णयाची अंमलबजावणी राज्यभर राबविण्याबाबत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व यशोमती ठाकूर यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याचा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. या क्रांतिकारी ठरावाची दखल राजकीय नेत्यांनी घेतली असून या निर्णयाला गती मिळणार आहे.

हेरवाड (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीने विधवा महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी विधवा प्रथा बंद करण्याचा ग्रामसभेत ठराव केला आहे. त्यामुळे या निर्णयाची राज्यभरात चर्चा होत असून निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.

या ठरावाची माहिती घेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी हेरवाड सरपंच सुरगोंडा पाटील, ग्रामसेवक, महिला सदस्या यांना सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या सभागृहात बोलावून घेतले. खासदार सुळे यांनी सरपंच पाटील यांच्याकडून ठरावाची माहिती घेतली. या निर्णयाबाबत कौतुक करत सुमारे एक तासहून अधिक काळ वेळ देत सविस्तर चर्चा केली. या ठरावाला राजकीय आश्रय मिळाल्याने विधवा महिलांच्या सन्मानाच्या प्रक्रियेला गती मिळणार हे निश्चित आहे.

हेरवाडकरांचे कौतुकविधवा महिलांना समाजात सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी विधवा, रूढी, परंपरेला मूठमाती देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव हेरवाड ग्रामपंचायतीने मांडला आहे. त्यामुळे या निर्णयाची राज्यभर चर्चा होत आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आदी रयत शिक्षण संस्था सातारा येथे सोमवारी आले होते. या ठिकाणी हेरवाड सरपंच सुरगोंडा पाटील यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक यांना बोलावून शरद पवार यांच्या हस्ते सरपंच पाटील यांचा सत्कार करत धाडसी निर्णयाचे कौतुक केले.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेkolhapurकोल्हापूर