शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : ‘नवं कोल्हापूर’साठी ऋतुराज पाटील यांना साथ द्या : ज्योतिरादित्य सिंधिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 16:12 IST

रोजगाराची सद्यस्थिती पाहता आज एका निर्णायक वेळेवर आपण उभे आहोत. योग्य बाजूला सत्तेचे पारडे झुकविण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे उठा, जागृत व्हा आणि भविष्यातील कोल्हापूरची नवनिर्मिती करण्यासाठी विकासाची दृष्टि आणि क्षमता असणाऱ्या ऋतुराज पाटील यांना साथ द्या, असे आवाहन काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शुक्रवारी येथे तरुणाईला केले.

ठळक मुद्दे‘नवं कोल्हापूर’ घडविण्यासाठी ऋतुराज पाटील यांना साथ द्या : ज्योतिरादित्य सिंधिया ‘यूथ कनेक्ट’द्वारे साधला तरुणाईशी संवाद

कोल्हापूर : रोजगाराची सद्यस्थिती पाहता आज एका निर्णायक वेळेवर आपण उभे आहोत. योग्य बाजूला सत्तेचे पारडे झुकविण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे उठा, जागृत व्हा आणि भविष्यातील कोल्हापूरची नवनिर्मिती करण्यासाठी विकासाची दृष्टि आणि क्षमता असणाऱ्या ऋतुराज पाटील यांना साथ द्या, असे आवाहन काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शुक्रवारी येथे तरुणाईला केले.जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मित्रपक्ष आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित ‘यूथ कनेक्ट’ कार्यक्रमात त्यांनी तरुणाईशी संवाद साधला.

येथील हॉटेल सयाजीच्या व्हिक्टोरिया हॉलमधील या कार्यक्रमास जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार सतेज पाटील, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, बाजीराव खाडे, प्रतिमा सतेज पाटील, काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील, चंद्रकांत जाधव प्रमुख उपस्थित होते.

रोजगारनिर्मिती करणे दूरच राहिले, उलट भाजप सरकारच्या गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रातील २२२० उद्योग बंद पडले असल्याची टीका ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केली. मुंबई-बंगलोरमधील ‘स्वीट पॉट’ हे कोल्हापूर आहे. येथे कृषीप्रक्रिया उद्योगांसाठी चांगली संधी असून त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतील.

‘मिशन रोजगार’ घेवून आलेल्या ऋतुराज या नवयुवकाला संधी द्या, त्याच्या कार्यक्षमतेतून ‘नवं कोल्हापूर’ निर्माण होईल. आपल्या सर्वांची साथ, पाठबळावर ऋतुराज हा नक्की आमदार होईल, असा मला विश्र्वास आहे. चांगले भविष्य घडवायचे असेल, तर इतिहास विसरु नका. भीती आणि चिंता मनातून काढून उत्सुकता, धैर्य बाळगा. शिक्षणाला अनुभवाची जोड देवून इतिहास लक्षात घेवून वर्तमानात राहून भविष्य घडवा, असे आवाहन सिंधिया यांनी केले.

या कार्यक्रमात ऋतुराज पाटील यांच्या ‘मिशन रोजगार’ संकल्पपत्राचे सिंधिया यांच्या हस्ते प्रकाशन झाले. सुमारे पाच हजार युवक-युवती संघटीत झालेल्या ‘फ्रेंडस आॅफ ऋतुराज’ या मोहिमेचा बँड प्रतिनिधीक युवक-युवतींनी सिंधिया यांना बांधला. यावेळी पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, आदींसह तरुणाई उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. महादेव नरके, राधिका ढणाल यांनी सूत्रसंचालन केले. 

 

टॅग्स :kolhapur-south-acकोल्हापूर दक्षिणcongressकाँग्रेस