शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

‘हेल्पर्स’चा आधार हरपला; रजनी करकरे - देशपांडे यांचे निधन, आज कोल्हापुरात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2017 01:24 IST

सुगम संगीताच्या ज्येष्ठ गायिका व हेल्पर्स आॅफ हॅन्डीकॅप्ड या संस्थेच्या उपाध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या रजनी करकरे - देशपांडे (वय ७४) यांचे शनिवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास निधन झाले.

कोल्हापूर, दि. 03 : सुगम संगीताच्या ज्येष्ठ गायिका व हेल्पर्स आॅफ हॅन्डीकॅप्ड या संस्थेच्या उपाध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या रजनी करकरे - देशपांडे (वय ७४) यांचे शनिवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनाने सुगम संगीत व दिव्यांगांच्या विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.श्वसन यंत्रणेतील बिघाडामुळे ३ आॅगस्टपासून येथील एका खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांना फिट्सचाही त्रास सुरू झाला होता. फुफ्फुसाच्या विकाराने रात्री सव्वाअकरा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती पी. डी. देशपांडे आहेत. अंत्यसंस्कार आज, रविवारी सकाळी आठ वाजता पंचगंगा स्मशानभूमीत होणार आहेत.रजनीताई यांना वयाच्या पाचव्या वर्षी पोलिओ झाला होता. पराकोटीच्या अपंगत्वावर मात करत त्यांनी संगीत क्षेत्रात नाव मिळविले. तीस वर्षांहून अधिक काळ आकाशवाणी पुणे, औरंगाबाद, सांगली, आदी केंद्रावरून गायनाचे कार्यक्रम सादर केले. विविध संस्थांच्या निमंत्रणावरून त्यांनी मैफिली सादर केल्या. ‘आनंदाचे डोही’ या त्यांच्या कार्यक्रमाचे एक हजारहून अधिक प्रयोग झाले आहेत. वरात, हे दान कुंकवाचे, दैवत, आदी सिनेमांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. १९८४ मध्ये नसिमा हुरजुक यांच्याबरोबर हेल्पर्स आॅफ दि हॅन्डीकॅप्ड या संस्थेची त्यांनी स्थापना केली. गेली तीस वर्षे या संस्थेच्या उपाध्यक्षा म्हणून त्या काम पाहात होत्या. सुचित्रा मोर्डेकर यांच्याबरोबर कलांजली या संस्थेची स्थापना करून सुगम संगीत मार्गदर्शनाचे वर्ग सोळा वर्षांहून अधिक काळ त्यांनी चालविले. महागायक अभिजित कोसंबी, प्रसन्नजित कोसंबी, शर्वरी जाधव, आदी शिष्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.१५ आॅगस्टला विवाहरजनीतार्इंना वयाच्या पाचव्या वर्षी १५ आॅगस्टलाच पोलिओ झाला होता. पराकोटीच्या अपंगत्वावर मात करत त्यांनी संगीत क्षेत्रात नाव मिळविले. पी. डी. देशपांडे यांच्याबरोबर १५ आॅगस्ट रोजी त्या विवाहबद्ध झाल्या. हा दिवस माझ्यासाठी नवा स्वातंत्र्यदिन असल्याचे त्या सांगायच्या.