शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

सुपर पिंक मूनचे होणार आज विलोभनीय दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 19:02 IST

कोल्हापूर : चैत्र पौर्णिमेची ही पौर्णिमा ही खगोल अभ्यासकांसाठी विलोभनीय राहणार आहे. आज, २७ एप्रिल रोजी मंगळवारी रात्री वर्षातील ...

ठळक मुद्देघरूनच सुपरमूनचा आनंद घेणार लॉकडाउनमुळे कार्यक्रमाचे आयोजन नाही

कोल्हापूर : चैत्र पौर्णिमेची ही पौर्णिमा ही खगोल अभ्यासकांसाठी विलोभनीय राहणार आहे. आज, २७ एप्रिल रोजी मंगळवारी रात्री वर्षातील पहिला सुपरमून दिसणार असून वातावरण जर ढगाळ नसेल तर याचा आनंद अभ्यासकांना घेता येणार आहे. यावेळी चंद्र नेहमीपेक्षा दहा टक्के मोठा आणि २५ टक्के तेजस्वी दिसेल, अशी माहिती खगोल अभ्यासक प्रा. अविराज जत्राटकर यांनी दिली आहे.अवकाशात पौर्णिमेच्या एक दिवस आधी आणि नंतरचे दोन्ही दिवस पूर्णचंद्र दिसणार आहे. या काळात चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर सर्वात कमी असते.परंतु सध्या ढगाळ वातावरण असल्याने आणि हवामान खात्याने पाउस पडण्याची शक्यता वर्तवल्यामुळे खगोल अभ्यासकांना या सुपर पिंक मूनचे दर्शन दुर्लभ आहे. कोरोनाच्या विषाणूचा प्रार्दुभाव आणि लॉकडाउनमुळे खगोल अभ्यासकांनी कोणतेही कार्यक्रम आयोजित केले नसले तरी अनेक खगोलप्रेमी घरूनच सुपरमूनचा आनंद घेणार आहेत.वर्षातील हा पहिलाच सुपरमून आहे.या पौर्णिमेच्या चंद्राला पिंक मून म्हणत असले तरी त्याचा रंगाशी काही संबंध नाही. खगोल वैज्ञानिकांनी सुपरमूनसाठी प्रत्येक पौर्णिमेला वेगळा रंग दिला आहे, म्हणून पिंकमून म्हणून याची ओळख निश्चित केली आहे.दुर्बिणीची गरज नाहीसूर्यास्तानंतर चंद्र पूर्वेकडून उगविताना मोठ्या आकाराचा दिसेल. हा सुपरमून पाहण्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता नाही, परंतु दुर्बिणीला फिल्टर लावून त्यावरील विवर पाहता येतील. याशिवाय डिसीएलआर कॅमेऱ्यानेही त्याची छायाचित्रे टिपता येतील. अर्थात कोल्हापूरकरांचे नशीब जोरावर असेल तर हे विलोभनीय दृश्य अनुभवायला मिळणार आहे. यावेळेस चंद्र आकाराने मोठा आणि खूप तेजस्वी दिसणार असल्याने या खगोलीय घटनेचा अभ्यासकांनी आनंद घ्यावा.

टॅग्स :Supermoonसुपरमूनkolhapurकोल्हापूर