शहरं
Join us  
Trending Stories
1
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
2
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
3
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
4
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
5
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
6
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
7
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
8
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
9
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
10
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
11
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
12
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध
13
भारतीय कंपन्या रशियन तेलाची खरेदी घटवणार; अमेरिकेकडून वाढवणार, तज्ज्ञांची माहिती
14
भारतातून ३०० कोटींच्या शेणाची निर्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाला मागणी
15
अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार
16
२५० कोटी व्याजासह जमा करा तरच म्हणणे ऐकू! मुंबई मेट्रोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
17
झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार
18
वायुप्रदूषणामुळे भारतात २०२३ मध्ये झाले २० लाख मृत्यू, संशोधन अहवालातील माहिती
19
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
20
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा

मुलाचा प्रेमविवाह अमान्य असल्याने सासू-सासऱ्याकडूनच सुनेचा गळा आवळून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 00:46 IST

कंदलगावमधील यशवंत हिंदोळे यांची रिया पाटील ही मुलगी. ती शाहूपुरीतील एका दवाखान्यात नोकरीला होती. दवाखान्याशेजारी काम करणारा बादल पाटील याच्याशी तिचे प्रेमसंबंध जुळले. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. मात्र, रियाचे यापूर्वीही लग्न झाले असल्याने

ठळक मुद्देफुलेवाडी रिंग रोड परिसरातील जयभवानी कॉलनीतील प्रकार

कोल्हापूर : मुलाने केलेला प्रेमविवाह मान्य नसल्याने सासू-सासºयाने सुनेचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार घडला. खुनाचा प्रकार लपविण्यासाठी दोघांनी सुनेचा मृतदेह दोरीने लटकावत आत्महत्येचा बनाव केला होता. मात्र, पोलिसांनी अवघ्या २४ तासांत हा बनावचा डाव उधळला. रिया बादल पाटील (वय ३४, रा. जयभवानी कॉलनी, फुलेवाडी रिंग रोड) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी सासरा सरदार रामचंद्र पाटील (५४), सासू सुनीता सरदार पाटील (५०) या दोघांना अटक करण्यात आली. बुधवारी (दि. २५) सायंकाळी सात वाजता हा प्रकार घडला होता; पण पोलिसांनी चौकशीअंती अवघ्या २४ तासांत हा बनाव उघड केला. गुरुवारी रात्री खुनाचा गुन्हा दाखल झाला.

कंदलगावमधील यशवंत हिंदोळे यांची रिया पाटील ही मुलगी. ती शाहूपुरीतील एका दवाखान्यात नोकरीला होती. दवाखान्याशेजारी काम करणारा बादल पाटील याच्याशी तिचे प्रेमसंबंध जुळले. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. मात्र, रियाचे यापूर्वीही लग्न झाले असल्याने बादलच्या आई-वडिलांना हा लग्नाचा निर्णय मान्य नव्हता. त्यामुळे या लग्नाला त्यांचा कायम विरोध होता; पण त्यावेळी बादलने आत्महत्येची धमकी दिल्याने आई-वडीलही हतबल झाले अन् दोन वर्षांपूर्वी या दोघांचे लग्न झाले.

मूल होत नसल्याने नाराजीरिया ही वारंवार आजारी पडत होती. तसेच तिला मूल होत नसल्याने सासरी नेहमी वाद होत होता. बादल हा एकुलता मुलगा असल्याने त्याचा वंश पुढे वाढण्यासाठी त्याने दुसरा विवाह करावा, अशी त्याच्या आई-वडिलांची इच्छा होती; पण त्याला बादलने विरोध दर्शविला होता.

विसंगतीमुळेबनाव उघडखुनाचा संशय आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ रियाच्या पतीसह सासू-सासऱ्याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत बादल याला कोणतीही माहिती नसल्याचे दिसून आले. मात्र, सासू सुनीता व सासरा सरदार यांच्या जबाबात विसंगती आल्याने दोघांकडेही कसून चौकशी केली असता खुनाचे सत्य बाहेर पडले अन् अवघ्या २४ तासांत खुनाचा उलगडा झाला.

मृताच्या मानेवर जखमा आढळल्यारिया बादल हिच्या मृतदेहाचे विच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांना रियाच्या मानेवर, हनुवटीवर जखमा आढळून आल्या. त्यांनी याची माहिती करवीरचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांना दिली. त्यानंतर करवीर तहसीलदारांसमोर शवविच्छेदन करण्यात आले. रियाच्या मानेभोवताली कापडाने आवळल्याचे व्रण आढळून आले. याबाबत संशय आल्याने पोलिसांनी तिचा शवविच्छेदनाचा व्हिसेरा राखून ठेवला होता.

आत्महत्येचा बहाणाबादल हा बुधवारी सकाळी कामावर गेला होता. त्याचे वडील सरदार पाटील, आई सुनीता पाटील व पत्नी रिया हे तिघेच घरात होते. चहा हवा असल्याने सरदार पाटील यांनी रियाला बोलावले असता ती खोलीत लटकत असल्याची दिसून आली. पाटील यांनी आरडाओरडा करून तिला खाली उतरविले. तिला उपचारासाठी ‘सीपीआर’मध्ये दाखल केले. त्यानंतर बादल हा घरी आला; पण उपचारापूर्वी रियाचा मृत्यू झाला होता, असा बनाव दोघांनी केला होता. तसेच आत्महत्येबाबत सासू सुनीता पाटील यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर