शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कळंबा तलावात उडी घेऊन युवकाची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 19:15 IST

पोट दुखत असल्याने काल सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र आज सोमवारी सकाळी दवाखान्यातून नितीन कोणालाही न सांगता निघून गेला होता.

कळंबा : कळंबा तलावाच्या मनोऱ्याच्या पूर्वेस तलाव पात्रात उडी घेऊन संभाजीनगर परिसरातील एका विवाहित युवकाने आत्महत्या केली. नितीन कुंडलिक पाटील (वय ३८, रा. गजानन महाराज कॉलनी) असे या युवकाचे नाव आहे. आत्महत्येपूवी तलावाच्या काठावर कोल्हापुरी चप्पल, पाकिट ठेवून त्याने तलावात उडी घेतली. आत्महत्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून याबाबत करवीर पोलीस अधिक तपास करीत आहेत.याबाबत माहिती अशी की, संभाजीनगर प्रभागात गजानन महाराज नगरात नितीन पाटील आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. घरी पत्नी दोन मुली असून दोन महिन्यांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह नितीन काम करत होता. मात्र काही दिवसापासून तो कामावर नव्हता.काल, रविवारी पोट दुखत असल्याने त्याला सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. सोमवारी सकाळी दवाखान्यातून नितीन कोणालाही न सांगता निघून गेला होता. सदरची बाब नितीनच्या पत्नीने त्याच्या मित्रांना कळवली होती. सोमवारी सायंकाळी चार वाजता तलावावर फिरावयास येणाऱ्या नागरिकांना कळंबा तलावात मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यांनी ही बाब कळंबा पोलीस पाटीलाना कळवली.घटनास्थळी तात्काळ करवीर पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढत सीपीआर येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. उत्तरीय तपासणी नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत्यूचे कारण अस्पष्ट असून करवीर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर