शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

करवीर तालुक्यात उभे ऊस पीके करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 15:07 IST

ऊस पीकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात पाण्याअभावी चांगलाच फटका बसतोय . ग्रामीण भागात शेती ओलीताखाली आणण्याचे शेती पाण्याचे नियोजन विस्कटले आहे . पाण्याअभावी उभे ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात सध्या नुकसान होऊ लागले आहे . ग्रामीण भागात शेती पाणीपट्टीचे प्रचंड स्वरूपात दरवाढ झाली पण शेतीला अपुरापाण्याचा पुरवठा होतो

ठळक मुद्देऊस  गळीत हंगामाच्या प्रारंभीच पाण्याअभावी करवीर तालुक्यात ऊस पिकांना चांगलाच फटका बसु लागल्याने ऊस वजनात कमालीचा आर्थिक तोटा शेतकऱ्यांना बसणार आहे . 

सावरवाडी : तब्बल एक महिनाभर शेतीला पाणीपुरवठा झाला नसल्याने शेतीमध्ये भेंगा पडल्याने ऊस पीके वाळत आहेत . ग्रामीण भागातील सहकारी पाणी पुरवठा संस्था सुरळीत सुरु झाल्या नाहीत .  शेतीच्या पाणीवाटपामध्ये नियोजनाचा अभाव आढळत आहे . शेतीस अपुरा पाणीपुरवठा होऊ लागल्याने करवीर तालुक्यात ऐन नोव्हेबर महिन्यात शेतीतील उभे ऊस पीके करपली आहेत . शेतकरी चिंतातुर बनाला आहे .      ऊस पीकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात पाण्याअभावी चांगलाच फटका बसतोय . ग्रामीण भागात शेती ओलीताखाली आणण्याचे शेती पाण्याचे नियोजन विस्कटले आहे . पाण्याअभावी उभे ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात सध्या नुकसान होऊ लागले आहे . ग्रामीण भागात शेती पाणीपट्टीचे प्रचंड स्वरूपात दरवाढ झाली पण शेतीला अपुरापाण्याचा पुरवठा होतो .

 सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या पाणीवाटपात  अकार्यक्षमतेमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे .. विलंबाने सहकारी पाणी पुरवठा संस्था सुरु झाल्याने शेतीला भेगा पडल्याने पाण्याचे फेर वेळेवर पूर्ण होत नाहीत  भोगावती तुळशी नद्याच्या पात्रात पाणी असुनही शेतीला पाणी मिळत नाही .परिणामी अडसाली ऊस .भात क्षेत्रातील लागणी करणे यांना पाणी मिळत नाही .परिणामी लागणीचा हंगाम लांबल्याने याला जबाबदार कोण?हा प्रश्न शेतकऱ्यांच्यासमोर उभा आहे .ऊस  गळीत हंगामाच्या प्रारंभीच पाण्याअभावी करवीर तालुक्यात ऊस पिकांना चांगलाच फटका बसु लागल्याने ऊस वजनात कमालीचा आर्थिक तोटा शेतकऱ्यांना बसणार आहे . 

  •  तालुक्यातील कसबा बीड, महें, कोगे, गणेशवाडी, सावरवाडी, बहिरेश्वर, आदिभागात उभे ऊसपीकांचे पाण्याअभावी नुकसान होऊ लागले आहे . पाणीपट्टीचे दर वाढले असुन त्यानुसार शेतीला पाणी मिळत नाही याचा परिणाम शेतीच्या अर्थव्यवस्थेवर बसत आहे . शेतकऱ्यांचे शेतीच्या व्यवसायात नुकसान संभवते . शेतीच्या पाण्यासाठी लढा उभारण्याचा सुर शेतकरी वर्गातुन उमटू लागला आहे

या वर्षी महापुर, अतिवृष्टी,परतीचा पाऊस, ऊस पाणीटंचाई याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे . पाणीपुरवठा संस्थांनी शेतीची पाणीपट्टीचे दर, कमी करावे . अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे .= वाळलेल्या ऊसाला नुकसान भरपाई हवी !

  • नोव्हेंबर महिन्यात वाळलेल्या ऊसाचा शेतकऱ्यांनी पंचनामे करून ऊस पिकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे .

 

तीव्र आंदोलन छेडणार !ऊस पिकांना पाणी न मिळास शेतकरी संघर्ष समिती स्थापन करून शेतकरी मेळावा घेऊन निबंधक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार  !दिनकर सुर्यवंशी,( महाराष्ट्र राज्य किसान सभा राज्य कौन्सील सदस्य )

टॅग्स :Farmerशेतकरीwater shortageपाणीकपात