शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

गरजेपेक्षा कमी उत्पादनामुळे साखरेचे दर वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 12:21 IST

इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) हंगामाच्या प्रारंभी ३३३ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज वर्तविला होता. त्या आधारे केंद्र सरकारने आपले धोरण ठरवले...

चंद्रकांत कित्तुरे -

कोल्हापूर : देशातील साखरेचे उत्पादन गरजेपेक्षा कमी होणार असल्याने साखरेचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखरेचा समावेश असलेल्या खाद्यपदार्थांचीही महागाई होण्याची शक्यता आहे. देशाला वर्षाला २८० लाख टन साखर लागते; मात्र यंदा २५९ लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाने रविवारी वर्तविला आहे. ‘इस्मा’ने हा अंदाज २६४ लाख टन तर ‘ऐस्टा’ने २५८ लाख टन उत्पादन होईल, असा वर्तविला आहे. 

इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) हंगामाच्या प्रारंभी ३३३ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज वर्तविला होता. त्या आधारे केंद्र सरकारने आपले धोरण ठरवले. १० लाख टन साखरेच्या निर्यातीलाही परवानगी दिली. यातील ५ लाख टनाहून अधिक साखरेची निर्यातही झाली आहे. मात्र, जसजसा हंगाम गती घेऊ लागला तसतसे साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता दिसू लागली. 

उत्पादन का घटले?उत्तर प्रदेशातील बहुसंख्य ऊस क्षेत्र व्यापलेल्या को —०२३८ या उसावर ‘रेड रॉट’ आणि ‘टॉप शूट बोरर’चे आक्रमण झालेले आणि त्याच वेळी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील उभ्या उसावर आलेला अकाली फुलोरा व  त्यामुळे खुंटलेली वाढ व साखर उताऱ्यावरील प्रतिकूल परिणाम झाला आहे. यामुळे उत्पादनात घट झाली आहे.  

 साखर उत्पादनाचा अंदाज घटविला : या आधारेच ‘इस्मा’ने आपल्या सुधारित अंदाजात २६४ लाख टन तर राष्ट्रीय साखर महासंघाने ३१९ वरून २५९ लाख टन आणि ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनने   ३२८ वरून २५८ लाख टनापर्यंत साखर उत्पादनाचा अंदाज घटविला आहे. यात इथेनॉलकडे वळविलेल्या साखरेचा समावेश नाही.

साखर कारखाने संकटातकमी झालेल्या गाळप हंगामाचा विपरीत आर्थिक परिणाम सर्व कारखान्यांवर होणार आहे. विशेषतः २०० साखर कारखाने असणाऱ्या महाराष्ट्रातील  यंदाचा गाळप हंगाम सरासरी फक्त ८३ दिवस इतकाच चालला आहे. 

कोणताही कारखाना किमान १४० ते १५० दिवस चालला तरच त्याचे अर्थकारण टिकत असते. यंदा ८३ दिवसाचा हंगाम आणि त्यातून केवळ ८० लाख टन नवे साखर  उत्पादन यामुळे महाराष्ट्रातील साखर उद्योग यंदा प्रचंड आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. 

३६५ दिवसांच्या खर्चाचा डोंगर, ८३ दिवसांचा हंगाम याचे गणित बसविणे कठीण आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने