शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

साखरेच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ, मंत्रिगटाची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 03:19 IST

नवी दिल्लीत झालेल्या मंत्रिगटाच्या या बैठकीस अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अन्नमंत्री रामविलास पास्वान, कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल हेही उपस्थित होते.

कोल्हापूर : साखरेचा किमान विक्रीदर दोन रुपयांनी वाढवून प्रतिकिलो ३३ रुपये करण्याची शिफारस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाने बुधवारी केली. सन २०१९-२० या हंगामातील सुमारे २० हजार कोटींची थकीत उसाची बिले कारखान्यांना देता यावीत, यासाठी ही शिफारस करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ही दरवाढ थोडा फार दिलासा देणारी असली तरी असमाधानकारक असल्याची प्रतिक्रिया साखर उद्योगातून व्यक्त झाली.नवी दिल्लीत झालेल्या मंत्रिगटाच्या या बैठकीस अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अन्नमंत्री रामविलास पास्वान, कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल हेही उपस्थित होते. शेतकऱ्यांना थकीत ऊस बिले लवकरात लवकर कारखान्यांकडून कशी अदा केली जातील, याविषयीच्या उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा होऊन साखरेच्या विक्री दरात वाढ करण्याच्या शिफारशींवर शिक्कामोर्तब करण्यात आले. अर्थमंत्रालयाने यासंदर्भातील नीती आयोगाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळापुढे ठेवावा, असे आदेशही मंत्रिगटाने दिले. साखर विक्री दरात वाढ करूनही ऊस उत्पादकांना थकीत बिले देण्यास अपयश आले, तर सरकार अन्य पर्यायांचीही विचार करेल, असेही सूत्रांनी सांगितले.कसा ठरविला जातो दरउसाची एफआरपी (रास्त आणि वाजवी किंमत) आणि सक्षम साखर कारखान्यांचा किमान उत्पादनखर्च विचारात घेऊन साखरेचा किमान विक्री दर ठरविण्याची पद्धत जून २०१८ पासून केंद्र सरकारने सुरू केली आहे. सुरुवातीला २९ रुपये दर ठरविण्यात आला होता. गेल्यावर्षी त्यात दोन रुपयांची वाढ करून तो ३१ रुपये करण्यात आला होता. बुधवारी त्यात आणखी दोन रुपये वाढ करण्याची शिफारस करण्यात आली.येत्या हंगामात एफआरपीतील वाढीमुळे टनामागे १०० रुपये शेतकऱ्यांना जादा द्यावे लागणार आहेत. त्यामुळे किलोमागे २ रुपये वाढ करूनही कारखान्यांपुढील अडचणी संपणार नाहीत. त्यामुळे ३५०० रुपये प्रतिक्विंटल विक्री दर देण्याच्या मागणीचा विचार सरकारने केला पाहिजे.- विजय औताडे,साखर उद्योगातील तज्ज्ञही वाढ असमाधानकारक आहे. ३३ रुपयाने साखर विकली तरी कारखान्यांना दीड ते दोन रुपये तोटा होणार आहे. साखरेचे ग्रेडनिहाय दर निश्चित करावेत, या मागणीचा विचार केला गेलेला नाही.- प्रकाश नाईकनवरे,व्यवस्थापकीय संचालक, राष्टÑीय साखर कारखाना महासंघ.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर