शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

साखरेच्या दरात घसरण, मेथी, पोकळा १0 रुपयाला तीन पेंढ्या : कोंथिबीर, टोमॅटोलाही मातीमोल दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 13:54 IST

साखरेच्या दरातील घसरण थांबण्याचे नाव घेत नाही, घाऊक बाजारात या आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी घसरण झाली आहे. भाजीपाला मार्केटमध्ये विविध भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात असून, मेथी, पोकळा या पालेभाज्यांचा दर १0 रुपयाला तीन पेंढ्या झाला आहे. कोंथिबीर, टोमॅटो तर मातीमोल किमतीने विकावा लागत आहे. फळ मार्केटमध्ये द्राक्षे, मोसंबी, चिक्कू, सफरचंद, कलिंगडेची रेलचेल पाहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देसाखरेच्या दरात घसरण, मेथी, पोकळा १0 रुपयाला तीन पेंढ्या कोंथिबीर, टोमॅटोलाही मातीमोल दर

कोल्हापूर : साखरेच्या दरातील घसरण थांबण्याचे नाव घेत नाही, घाऊक बाजारात या आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी घसरण झाली आहे. भाजीपाला मार्केटमध्ये विविध भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात असून, मेथी, पोकळा या पालेभाज्यांचा दर १0 रुपयाला तीन पेंढ्या झाला आहे. कोंथिबीर, टोमॅटो तर मातीमोल किमतीने विकावा लागत आहे. फळ मार्केटमध्ये द्राक्षे, मोसंबी, चिक्कू, सफरचंद, कलिंगडेची रेलचेल पाहावयास मिळत आहे.यंदा साखरेच्या उत्पादनात वाढ झाली असून, त्याचा परिणाम दरावर दिसत आहे. केंद्र सरकारने प्रतिक्विंटल २९०० रुपयांपेक्षा कमी दराने साखर विक्री न करण्याचा निर्णय घेतल्याने तिथेपर्यंत साखर थांबली आहे. तरीही गेल्या आठवड्यापेक्षा घाऊक बाजारात प्रतिक्विंटल ५० रुपयांची घसरण झाली आहे; पण किरकोळ बाजारात अजूनही साखर सरासरी ३४०० रुपयांपर्यंत आहे. कोबी, वांग्यांच्या दरातही घसरण झाली असून, घाऊक बाजारात वांगी सरासरी १० रुपये किलो आहेत.

टोमॅटोची आवक स्थिर असली, तरी लालभडक टोमॅटो सरासरी ११ रुपये किलो आहे. ओल्या वाटाण्याची आवक चांगली आहे, किरकोळ बाजारात ३0 रुपये किलो दर आहे. वरणा, दोडका, गवार, ढब्बू या भाज्यांचे दर तुलनेत स्थिर आहेत. पालेभाज्यांच्या आवकेत मोठी वाढ झाली आहे. मेथी, पोकळा, पालकच्या दरात घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात १0 रुपयाला तीन पेंढ्या दर आहे, तर एरव्ही २0 रुपये पेंढी असणारी कोंथिबीर १0 रुपयाला दोन पेंढ्या मिळत आहेत.फळ मार्केटमध्ये मोसंबी, द्राक्षे, सफरचंद, डाळींब, कलिंगडेची रेलचेल आहे. डाळींब २0 रुपये, तर सफरचंद ८० रुपये किलो आहे. महिन्याभरापासून काळ्या पाटीच्या कलिंगडेची आवक सुरू आहे, २0 रुपयाला हे कलिंगड मिळत आहे. त्याबरोबरच आता हिरव्या पाटीच्या कलिंगडेची आवक सुरू झाली असून, मोठ्या कलिंगडेचा ८० रुपयांपर्यंत दर आहे. हरभरा डाळ, तुरडाळ, सरकी तेलाचे दर स्थिर आहे. ज्वारी प्रतिकिलो २५ ते ५० रुपये आहे. नारळाची आवक कमी असल्याने खोबरे व खोबरेल तेलाचे दर चढेच आहेत. कांदा, बटाट्याचे दर स्थिर आहेत. घाऊक बाजारात कांदा सरासरी ४, तर बटाटा १२ रुपये किलो आहे.रुपयाला पिवळाधमक लिंबूफेबु्रवारी महिना सुरू झाल्याने थंडी कमी होऊन उष्णता वाढू लागते; त्यामुळे शीतपेयांच्या मागणीत वाढ होते; पण यंदा अद्याप थंडी असल्याने लिंबूची मागणी कमी आहे. परिणामी किरकोळ बाजारात पिवळाधमक लिंबू रुपयाला मिळत आहे.

हापूसची आवककोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत या आठवड्यात हापूस आंब्याची आवक झाली. आवकेला अजून गती नसली, तरी मागणीही फारशी नाही. समितीत चार बॉक्सची आवक झाली, सरासरी ५२५ रुपये बॉक्सचा दर राहिला आहे. 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर