शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखान्यांना साठा मर्यादा लाग जूनमध्ये बाजारात उपलब्ध होणार २१ लाख टन साखरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 01:39 IST

साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सात हजार कोटींचे पॅकेज जाहीर केल्यानंतर देशातील साखर कारखान्यांसाठी साठा मर्यादा लागू करतानाच आणि प्रत्येक साखर कारखान्याने या महिन्यात

चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सात हजार कोटींचे पॅकेज जाहीर केल्यानंतर देशातील साखर कारखान्यांसाठी साठा मर्यादा लागू करतानाच आणि प्रत्येक साखर कारखान्याने या महिन्यात किती साखरेची विक्री करायची याचेही प्रमाण ठरवून दिले. त्यानुसार या महिन्यात देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी २१ लाख टन साखर उपलब्ध होणार आहे.

अतिरिक्त साखरेचे उत्पादन आणि घसरलेले दर यामुळे देशातील साखर उद्योग अडचणीत आला आहे. ऊस बिलाची २२ हजार कोटींची थकबाकी कारखान्यांकडे आहे, ती देता यावी यासाठी प्रतिटन ५५ रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने याआधी जाहीर केला होता. बुधवारी (दि.६) इथेनॉल उत्पादनासाठी ४ हजार ४०० कोटी रुपये, ३० लाख टनाचा बफर स्टॉक करणे, साखरेचा किमान दर २९ रुपये प्रतिकिलो निश्चित करणे, असे निर्णय घेतानाच सात हजार कोटींचे पॅकेज या उद्योगासाठी जाहीर केले होते.त्याच्या दुसºया दिवशी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. साठा मर्यादा आणि साखर विक्री २९ रुपये प्रतिकिलो किमान दर यासंदर्भातल्या अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर प्रत्येक कारखान्याच्या या महिन्यातील साखर विक्रीचा कोटाही ठरवून देण्यात आला आहे.

यानुसार या महिन्यात २१ लाख मेट्रिक टन साखर खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. कोटा ठरवून दिलेल्या देशातील ५२८ साखर कारखान्यांमध्ये महाराष्ट्रातील १८६ साखर कारखान्यांचा यामध्ये समावेश आहे.साखर उद्योग सरकारी नियंत्रणाखालीदेशातील साखर उद्योग २०१३ मध्ये केंद्र सरकारने अंशत: नियंत्रणमुक्त केला होता. त्यानुसार कारखान्यांना बाजारात कितीही साखर विक्री करण्याची मुभा होती. मात्र, बुधवारच्या केंद्राच्या निर्णयानुसार तो पुन्हा सरकारी नियंत्रणाखाली आला आहे. किमान ठरवून दिलेल्या दरापेक्षा जादा दराने साखर विक्री करण्याची कारखान्यांना मुभा असली तरी ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा जादा साखर त्यांना विकता येणार नाही.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर