शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

ऐन पावसाळ्यात ऑक्टोबर हीटचा प्रत्यय, कोल्हापूरचा पारा ३१ डिग्रीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 11:24 IST

ऐन पावसाळ्यात कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. सकाळी १० वाजता ऑक्टोबर हीटचा प्रत्यय येत आहे. तापमान ३१ डिग्रीवर गेले असून, किमान तापमानातही वाढ झाल्याने उष्मा वाढत आहे.

ठळक मुद्देऐन पावसाळ्यात ऑक्टोबर हीटचा प्रत्यय कोल्हापूरचा पारा ३१ डिग्रीवर : किमान तापमानातही झाली वाढ

कोल्हापूर : ऐन पावसाळ्यात कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. सकाळी १० वाजता ऑक्टोबर हीटचा प्रत्यय येत आहे. तापमान ३१ डिग्रीवर गेले असून, किमान तापमानातही वाढ झाल्याने उष्मा वाढत आहे.मृग नक्षत्रात कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. आठवड्यात नद्यांचे पाणी पात्राबाहेर गेले. पावसाचा जोर पाहता पुराची भीती वाटत होती; मात्र आर्द्रा नक्षत्र निघाल्यापासून पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी उघडझाप सुरू होती. मात्र गेल्या चार दिवसांपासून एकदमच खडखडीत ऊन पडत आहे.

तापमान वाढू लागले असून कमाल तापमान ३१ डिग्रीपर्यंत पोहोचले आहे. त्यातही किमान तापमान २३ डिग्रीपर्यंत असल्याने उष्मा जाणवत आहे. त्यामुळे सकाळी १० वाजताच अंगाला चटके बसत आहेत. ऐन पावसाळ्यात नागरिकांना ऑक्टोबर हीटचा प्रत्यय येत आहे. दिवसरात्र पारा वाढत जात आहे.येत्या दोन दिवसांत तापमान कायम राहणार असून किमान तापमानात थोडी वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे.

आगामी चार दिवसांत असे राहील तापमान डिग्रीमध्ये -दिवस            किमान    कमाल        हवामान

  • गुरुवार      २४             ३२            ऊन
  • शुक्रवार      २४            ३१           ऊन, काहीसे ढगाळ
  • शनिवार     २३            ३२           ढगाळ

 

टॅग्स :Temperatureतापमानkolhapurकोल्हापूर