शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात मुनगंटीवार विजय झालेत; चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केला निकाल

By विश्वास पाटील | Updated: April 9, 2024 19:35 IST

विरोधकांना निवडणूकच न लढवता आराम करण्याचा सल्ला दिला

कोल्हापूर : चंद्रपूर-वणी लोकसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विजयी झालेच म्हणून समजा असे सांगत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या विजयाची मतदानापूर्वीच घोषणा करून टाकली. मंत्री पाटील मंगळवारी येथे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचार कार्यालयाच्या उदघाटन कार्यक्रमात बोलत होते.मंत्री पाटील म्हणाले, अबकी बार चारसौ पार याबध्दल आपल्याला आत्मविश्र्वास आणि विरोधकांनाही विश्र्वास वाटत आहे. सल्ला देण्यासाठी फक्त दोनशे कोटी रुपये घेणारे राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनीही भाजप ३०० जागा जिंकेल असे जाहीर केले आहे. त्यांनी विरोधकांना लोकसभेची ही निवडणूकच लढवू नका, यावेळेला आराम करूया, वेळ आणि पैसाही वाचेल. पुढे २०२९ ची तयारी नीट करूया असे सुचवले आहे. चारसौ पार ही अतिशयोक्ती नाही. कारण आताच आमच्याकडे ३५३ जागा आहेत. त्यात फक्त ४७ जागांची नव्याने भर घालायची आहे. गेल्या निवडणुकीत ज्या १४४ जागांवर पराभव झाला त्यावर आम्ही गेली पाच वर्षे काम करत आहे. तिथे चार-चार केंद्रीय मंत्र्यांची ताकद लावली आहे. चंद्रपूरची जागेवर कांहीतरी मतांनी आमचा पराभव झाला. आता तिथे सुधीरभाऊ लढत आहेत. ही जागा मिळणार की नाही, ही जागा तर आलीच म्हणून समजा. अशा १४४ पैकी अगदी कांहीही झाले तरी गेलाबाजार ५० जागा निवडून आणणे आम्हाला सहज शक्य असल्याचा दावा मंत्री पाटील यांनी केला व विरोधकांना निवडणूकच न लढवता आराम करण्याचा सल्ला दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrahar patilचंद्रहार पाटीलSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार