शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बीएडच्या सीईटी परिक्षेच्या केंद्रात अचानक बदल, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांना भुर्दंड

By संदीप आडनाईक | Updated: April 23, 2023 22:05 IST

उच्च आणि तंत्रशिक्षण मंडळाकडून राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दोन वर्षाच्या बीएड अभ्यासक्रमासाठी (जनरल आणि स्पेशल ) ऑनलाईन महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा २३, २४ आणि २५ एप्रिल या कालावधीत होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : उच्च आणि तंत्रशिक्षण मंडळाकडून राज्य शिक्षण मंडळातर्फे सीईटी सेलमार्फत घेण्यात येणारी बीएड (जनरल आणि स्पेशल ) महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा रविवारी घेण्यात आली, मात्र या परीक्षेसाठी कोल्हापूरातील केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाने या परीक्षेचे केंद्र अचानक रद्द करुन ३५ किलोमीटर अंतरावरील वाठार येथील अशोकराव माने टेक्निकल इन्स्टिट्यूट येथील केंद्रात पाठविल्याने केआयटी केंद्रावरील शंभराहून अधिक विद्यार्थ्यांना नाहक मन:स्ताप आणि भुर्दंड सहन करावा लागला.

उच्च आणि तंत्रशिक्षण मंडळाकडून राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दोन वर्षाच्या बीएड अभ्यासक्रमासाठी (जनरल आणि स्पेशल ) ऑनलाईन महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा २३, २४ आणि २५ एप्रिल या कालावधीत होत आहे. या परीक्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी बसले आहेत. रविवारी होणाऱ्या या प्रवेश परीक्षेसाठी कोल्हापूरातील सुमारे शंभरावर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाच्या केंद्रावर होणार होती. सकाळी ९ ते १०.३० या वेळेत होणाऱ्या या परीक्षेचे ॲडमिट कार्डही विद्यार्थ्यांकडे तयार होते. रविवारी सकाळी ७.३० वाजता रिपोर्टिंग करण्याचे बंधन होते. त्यामुळे अनेक विद्यार्थी सकाळी ७ वाजल्यापासूनच या महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोहोचले. परंतु तेथील सुरक्षा रक्षकांनी विद्यार्थ्यांना आत प्रवेश करु दिला नाही.

या महाविद्यालयात एक मोठा कार्यक्रम होणार असल्याने हे परीक्षा केंद्र रद्द केल्याची माहिती सुरक्षा रक्षकांनीच तब्बल अर्ध्या तासांनी म्हणजे सकाळी ८ वाजता विद्यार्थ्यांना सांगितली आणि तेथून सुमारे ३५ किलोमीटर दूर अंतर असलेल्या वाठार येथील अशोकराव माने इन्स्टिट्यूट हे केंद्र दिल्याचे सुरक्षा रक्षकांनीच सांगितले. त्यानंतर या परिसरातील एकमेव नेट कॅफेमध्ये जाउन विद्यार्थ्यांनी वाठारच्या कॉलेजचे ॲडमिट कार्ड काढून घेउन वाठारला पोहोचले. ठीक ९ वाजता ही परीक्षा सुरु होणार असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना या जागेवर पोहोचण्यासाठी कसरत करावी लागली. यामुळे मोठा प्रवास आणि भुर्दंड याबरोबरच मानसिक तसेच शारिरिक त्रास सहन करावा लागला तो वेगळाच.

विद्यार्थ्यांना मेसेज परीक्षा झाल्यावरया परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी २४ मार्च रोजी अर्ज भरले होते, प्रत्यक्षात २२ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता परीपा केंद्राची लिंक असलेला मेसेज पाठविला गेला. दुसऱ्या केंद्रावरचे ॲडमिट कार्ड काढायलाही वेळ गेला. हा बदल झालेला मेसेजही ती परीक्षा झाल्यानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मिळाला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर