शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

उपनगरांचा श्वास गुदमरतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:34 AM

अमर पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंबा : वाढती धूळ, जळालेला कचरा, कचरा उठावातील अनियमितता, नालेसफाईअभावी घनकचºयांच्या दुर्गंधीने तुंबलेले नाले, प्लास्टिक व रासायनिक वस्तूंचे वाढते प्रमाण आणि वाहनांच्या प्रदूषणामुळे उपनगरांत राहणाºया नागरिकांत दमा, श्वसनविकार आणि फुप्फुस विकारांत प्रचंड वाढ झाली आहे. प्रदूषण , धूळ, धुराच्या संपर्कात आल्याने नागरिकांना सर्दी, खोकला, कफ वाढणे, ...

अमर पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंबा : वाढती धूळ, जळालेला कचरा, कचरा उठावातील अनियमितता, नालेसफाईअभावी घनकचºयांच्या दुर्गंधीने तुंबलेले नाले, प्लास्टिक व रासायनिक वस्तूंचे वाढते प्रमाण आणि वाहनांच्या प्रदूषणामुळे उपनगरांत राहणाºया नागरिकांत दमा, श्वसनविकार आणि फुप्फुस विकारांत प्रचंड वाढ झाली आहे. प्रदूषण, धूळ, धुराच्या संपर्कात आल्याने नागरिकांना सर्दी, खोकला, कफ वाढणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासारखे आजार वाढत आहेत. वातावरणातील धूळ व धुराचा लहान मुले व वृद्धांना सर्वाधिक त्रास होत असल्याने त्यांनाश्वसनाचे गंभीर विकार जडतआहेत.धूळप्रवण उपनगरे अशी अलीकडे उपनगरांची नवी ओळख निर्माण होत आहे. निश्चित मानांकाइतके प्रदूषण आता उपनगरांतही वाढत चालल्याने उपनगरांचा श्वास गुदमरतोय. उपनगरातील वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने हवा प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे.धूळ आणि धुरांच्या मिश्रणाने उपनगरवासीयांचा श्वास गुदमरत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दमा व श्वसनासंबंधीचे विकार वाढीस लागल्याचे डॉक्टर सांगत असले तरी विविध प्रशासनाकडून याची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे.उपनगरांतील मुख्य रस्ते सिमेंट, डांबराचे असले तरी या रस्त्यांवरून वाहने गेल्यानंतर प्रचंड धूळ उडते. उपनगरांतील बहुतांशी कॉलन्यातील रस्ते विकसित नाहीत. त्यामुळे वाहन जाताच रस्ते धूळप्रवण बनतात. रस्त्यांवरील धूळ हवेत मिसळून नाकावाटे नागरिकांचे श्वसनसंस्थेत प्रवेश करते. सायंकाळच्यावेळी रस्त्यावरील धूळ, वाहनांचा धूर व जड हवा यांच्या मिश्रणाची दाट चादर उपनगरांतील वातावरणात पसरते. श्वसन विकारात खोकला, कफ होणे, श्वास घेण्याचा त्रास होणे, छातीत घरघर करणे, फुप्फुस कमकुवत होणे, आदी गंभीर आजारांनी डोके वर काढले आहे.वाढते प्रदूषण, धकाधकीची जीवनशैली व मानसिक ताण यामुळे दिवसेंदिवस अस्थमाचे रुग्ण वाढत असून, वैशिष्ट्य म्हणजे शाळकरी मुलांना मोठ्या संख्येने अस्थमाने जाळ्यात ओढले आहे. उपनगरांत अनेकांना अस्थमा झाल्याची कल्पनाही नसते. शाळकरी मुलांतील वाढते अस्थमाचे प्रमाण चिंताजनक असल्याचे अनेक डॉक्टरांचे मतआहे.उपनगरातील वातावरणातील प्रदूषणास कारणीभूत ठरणारे कार्बन मोनोआॅक्साईड, सल्फेट नायट्रेटस, ब्लॅक कार्बन, धुळीचे कण व २.५ मायक्रॉनचे पार्टीकल कण श्वासाद्वारे श्वसननलिकेत जावून ती लालसर होऊन आकुंचन पावते. यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी जागरूकता बाळगणे क्रमप्राप्तआहे.वाढलेली वाहनांची संख्या, कचरा उठावातील अनियमिततेने परिसरात पसरणारी दुर्गंधी, घनकचºयांनी तुंबलेले नाले यामुळे उपनगरवासीयांचा श्वास गुदमरतोय. पर्यावरण प्रदूषणप्रश्नी आता नागरिकांनी गंभीर होऊनसावधगिरीची पावले उचलणे क्रमप्राप्त बनले आहे.वाहनांच्या धुरामुळे होणारे प्रदूषण व धूळ मानवी आरोग्यासाठी घातक असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क किंवा नाकास रुमाल बांधावा. प्रदूषण कमी होण्यासाठी सायकलचा वापर वाढवावा, परिसर स्वच्छतेस प्राधान्य द्यावे.- डॉ. सुनील चं. बकरे,सहयोगी प्राध्यापक यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालय, कोडोली