शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: हातकणंगलेत गौण खनिज उत्खनन, शासनाचे लाखो रुपये बुडाले; कारवाई अटळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 13:25 IST

महसूल विभाग आणि स्टोन क्रशर चालकांचे साटेलोटे असल्यामुळे शासनाचे लाखो रुपये बुडाल्याचे ईटीएस मोजणीतून समोर आले

दत्ता बीडकर हातकणंगले : तालुक्यातील गौण खनिज उत्खननाची शासन रॉयल्टी ५०० ब्रास आणि उत्खनन हजार ब्रास, हे मोजणीअंती स्पष्ट झाले आहे. महसूल विभाग आणि स्टोन क्रशर चालकांचे साटेलोटे असल्यामुळे शासनाचे लाखो रुपये बुडाल्याचे ईटीएस मोजणीतून समोर आले आहे. या करचोरी प्रकरणाने महसूल यंत्रणा आणि क्रशर चालकांवर कारवाई अटळ बनली आहे. याच्या धास्तीने तालुक्यातील तलाठी, मंडल अधिकारी, अव्वल कारकूनसह अधिकारी यंत्रणा हबकून गेली आहे.हातकणंगले तालुक्यात असलेल्या दगड खाणी आणि स्टोन क्रशरचालकांकडून जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि सीमावर्ती भागामध्ये दगड, खडी, वाळू, सहसाहित्याचा पुरवठा केला जातो. यासाठी शासनाने क्रेशर मालकांना गायरानमधील जमिनी अटी आणि शर्तीवर गौण खनिज उत्खननासाठी भाडेपट्ट्याने दिलेल्या आहेत.महसूल यंत्रणेला हाताशी धरून क्रेशर चालकांकडून करचोरी केली जात असल्याचे उघड झाले आहे. गौण खनिज उत्खनन करण्यासाठी शासनाला ५०० ब्रासची रॉयल्टी भरायची आणि हजार ब्रासचे उत्खनन करायचे असे प्रकार उघड झाले आहेत. प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी सुहास गाडे यांनी ही करचुकवेगिरी उघड केली आहे. अवघ्या ४५ दिवसांच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या प्रशासनाची छाप गौण खनिज करचुकवेगिरी करणाऱ्यांविरुद्ध पाडली आहे.गौण खनिज उत्खननमध्ये शासनाचा मोठ्या प्रमाणात कर चुकविला जात असल्याचे त्यांनी केलेल्या ईटीएस मोजणीमध्ये स्पष्ट झाले आहे. शासनाकडे ५०० ब्रासची रॉयल्टी भरायची अन् उत्खनन मात्र हजारो ब्रास करायचे हे ईटीएस मोजणीद्वारे स्पष्ट झाल्याने सर्व क्रशर चालकांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा देण्यात आल्याने तालुक्यात जवळपास दोन लाख ब्रासची सुमारे ४० कोटींची करचुकवेगिरी उघड झाली आहे.गौण खनिजच्या रॉयल्टी भरण्याच्या प्रक्रियेमध्ये तलाठी, मंडल अधिकारी यांचे जागेवरील पंचनामे, त्यांच्या पंचनाम्यानुसार कारकून आणि आणि अधिकारी यांनी मंजूर केलेली रॉयल्टी चलने आणि प्रत्यक्ष कर भरणा ही संपूर्ण यंत्रणा चौकशी आणि कारवाईच्या फेऱ्यात आल्याने कारवाई अटळ बनली आहे.

गौण खनिजची लाखो रुपयांची करचुकवेगिरी या मोजणी प्रणालीमुळे उघड होणार आहे. कोट्यवधी रुपये शासनाच्या तिजोरीमध्ये जमा होणार आहेत. महसूल विभागाचे वर्षभराचे उद्दिष्ट या करवसुलीतून पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. - सुहास गाडे, सहायक जिल्हाधिकारी, प्रशिक्षाणार्थी तहसीलदार, हातकणंगले

टॅग्स :kolhapurकोल्हापूर