शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल : महाराष्ट्र, प्रिन्स शिवाजी, कोल्हापूर, न्यू हायस्कूलची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 11:17 IST

कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित केलेल्या सुब्रतो मुखर्जी १४ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूल, प्रिन्स शिवाजी इंग्लिश स्कूल, न्यू हायस्कूल, आदी संघांनी प्रतिस्पर्धी संघावर मात करत आगेकूच सुरू ठेवली.

ठळक मुद्देमहाराष्ट्र, प्रिन्स शिवाजी, कोल्हापूर, न्यू हायस्कूलची बाजी१४ वर्षांखालील सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धा

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित केलेल्या सुब्रतो मुखर्जी १४ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूल, प्रिन्स शिवाजी इंग्लिश स्कूल, न्यू हायस्कूल, आदी संघांनी प्रतिस्पर्धी संघावर मात करत आगेकूच सुरू ठेवली.विभागीय क्रीडा संकुलात शुक्रवारी सकाळी झालेल्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सामन्यात महाराष्ट्र हायस्कूल संघाने न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलचा ४ गोलनी पराभव केला. महाराष्ट्रच्या संकेत मेढे, शुभम बेडेकर यांनी प्रत्येकी एक व प्रशांत सालबादे याने दोन गोल नोंदविले.

प्रिन्स शिवाजी इंग्लिश स्कूलने सेंट अँथोनी स्कूलवर १ गोलने मात केली. एकमेव गोल प्रतीक कांबळे याने नोंदविला. कोल्हापूर इंग्लिश स्कूलने फोर्ट अकॅडमीवर एक तर न्यू हायस्कूलने आनंद इंग्लिश स्कूलवर तीन गोेलने मात केली.राधाबाई शिंदे स्कूल आणि करवीर प्रशाला यांच्यातील सामन्यावेळी करवीर प्रशाला शाळेचा संघ उपस्थित राहिला नाही. पोदार इंटरनॅशनल स्कूलने इंदिरा गांधी हायस्कूलवर मात केली. हा विजयी गोल पोदारकडून चिन्मय मुदगडे याने नोंदविला.

कोल्हापूर इंग्लिश स्कूलने महानगरपालिका जरगनगर विद्यालयावर १ गोलनी मात केली. यश पाटीलने हा गोल नोंदविला. स. म. लोहिया हायस्कूलने महावीर इंग्लिश स्कूलवर ३-२ अशी टायब्रेकरवर मात केली. छत्रपती शाहू विद्यालयाने प्रायव्हेट इंग्लिश स्कूलवर दोन गोलने मात केली.

शाहू दयानंद हायस्कूलने माधवराव बागल हायस्कूलवर २-० अशा फरकाने पराभव केला. शिलादेवी डी. शिंदे हायस्कूलने चाटे इंग्लिश स्कूलचा टायब्रेकरवर २-१ असा पराभव केला. जयभारत हायस्कूलने विमला गोयंका स्कूलचा २-१ अशी टायब्रेकरवर मात केली. अखेरच्या सामन्यांत शांतीनिकेतन स्कूलने शिवाजी मराठा हायस्कूलचा ०-१ असा टायब्रेकरवर पराभव केला.मैदानात मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने शालेय विद्यार्थ्यांचा कस लागत आहे. एकूणच मैदानाची स्थिती पाहिली तर संयोजकांनी अन्यत्र मैदानाचा पर्याय उपलब्ध करावा. अशी मागणी पालकांतून होत आहे. 

 

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर