मेघोली धरणाचा नवीन प्रस्ताव सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:31 AM2021-09-09T04:31:38+5:302021-09-09T04:31:38+5:30

मुख्यमंत्र्यांचे आदेश : आमदार आबिटकर यांचा पाठपुरावा लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मेघोली (ता. भुदरगड) येथील नवीन धरणाचा प्रस्ताव ...

Submit a new proposal for Megholi Dam | मेघोली धरणाचा नवीन प्रस्ताव सादर करा

मेघोली धरणाचा नवीन प्रस्ताव सादर करा

Next

मुख्यमंत्र्यांचे आदेश : आमदार आबिटकर यांचा पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : मेघोली (ता. भुदरगड) येथील नवीन धरणाचा प्रस्ताव राज्य शासनास तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांना बुधवारी दिले.

आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेत मेघोली धरणफुटीमुळे झालेल्या नुकसानीबाबत नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत करून प्रकल्प उभारणीस त्वरित मंजुरी व आर्थिक निधीची तरतूद करण्याची मागणी केली.

मेघोली लपा तलाव फुटल्यामुळे ४०० हेक्टरहून अधिक शेतीचे नुकसान झाले असून यामध्ये मानवी व पशुधनाची हानी झाली आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये २१ ते २६ जुलै २०२१ यादरम्यान ११०० मिलीमीटर पाऊस पडला असून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मदत निधीच्या नियमानुसार धरण फुटी दिवशी कमीत कमी ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली नाही. त्यामुळे मेघोली प्रकल्प फुटीबाबत घडलेली घटना ही नियामांमध्ये बसत नसल्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांनी सांगितले. त्यामुळे याकरिता खास बाब म्हणून राज्य शासनाने या नुकसानग्रस्तांना मदत करणे गरजेचे आहे. याबाबतचा स्वयंस्पष्ट अहवाल राज्य शासनास प्राप्त झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत व प्रकल्पाच्या उभारणीस निधी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासन निर्णय येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी सभापती बाबा नांदेकर, संग्रामसिंह सावंत उपस्थित होते.

Web Title: Submit a new proposal for Megholi Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.