शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये ‘खुल्या जागां’चा विषय पुन्हा ऐरणीवर, अमन मित्तल यांची कार्यवाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 14:44 IST

ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील खुल्या जागांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. ‘लोकमत’ने सातत्याने हा विषय लावून धरल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी मंगळवारी (दि. ३०) होणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा होणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

ठळक मुद्दे‘खुल्या जागां’चा विषय पुन्हा ऐरणीवर, अमन मित्तल यांची कार्यवाही गटविकास अधिकाऱ्यांच्या बैठकीत होणार चर्चा

कोल्हापूर : ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील खुल्या जागांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. ‘लोकमत’ने सातत्याने हा विषय लावून धरल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी मंगळवारी (दि. ३०) होणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा होणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.गेल्या दोन वर्षांपासून हा खुल्या जागांचा प्रश्न ‘लोकमत’ने लावून धरल्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी याबाबत सविस्तर पत्र तयार करून ग्रामपंचायतींना पाठविण्याच्या सूचना ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांना केल्या होत्या. तसेच विशिष्ट तक्त्यामध्ये माहितीही मागविण्याच्या सूचना दिल्या होत्या.यानंतर अनेक गटविकास अधिकाऱ्यांच्या सातत्याने मागे लागल्यानंतर बहुतांश तालुक्यांची माहिती ग्रामपंचायत विभागाकडे एकत्र झाली आहे. या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी करवीर तालुक्यातील ग्रामसेवकांची एक खास बैठक जिल्हा परिषदेमध्ये गेल्या वर्षी घेतली होती. डॉ. खेमनार बदलून गेल्यानंतर पुन्हा या विषयाचा पाठपुरावा केला गेला नाही.आता याबाबत ‘लोकमत’ने पुन्हा विचारणा केल्यानंतर मित्तल यांनी राजेंद्र भालेराव यांच्याक डून खुल्या जागांबाबतचे नियम, अटी आणि शर्ती यांची माहिती मागविली आहे. तसेच याबाबत महाराष्ट्र शासनाचे जे जे आदेश आहेत, ते संकलित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

याचाच पुढचा टप्पा म्हणून दर महिन्याच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या समन्वय समिती बैठकीमध्ये आता खुल्या जागांचा आढावा घेण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्यामध्ये हा आढावा घेतला जाणार असल्याने खुल्या जागा सोईने ताब्यात घेणाऱ्या किंवा न घेणाऱ्या ग्रामपंचायतींच्या कारभाराला यामुळे शिस्त लागणार आहे.

परदेशी संशोधक विद्यार्थिनीलाही सांगितले महत्त्वअमन मित्तल यांच्याशी आपत्ती व्यवस्थापनाबाबत चर्चा करून माहिती घेण्यासाठी जर्मनीहून एक संशोधक विद्यार्थिनी गेल्या पंधरवड्यात आली होती. तिच्याशी चर्चा करतानाही मित्तल यांनी आपत्ती व्यवस्थापनामध्ये खुल्या जागांचे महत्त्व स्पष्ट केले. जेव्हा एखाद्या वसाहतीमध्ये एखादी दुर्घटना घडेल तेव्हा तेथे खुली जागा नसणे तोट्याचे ठरू शकते. वसाहतीमधील नागरिकांनाही ही खुली जागा सार्वजनिक वापरासाठी मिळणे हा त्यांचा हक्क असल्याचेही त्यांनी सांगितले. 

‘लोकमत’ने अतिशय महत्त्वाचा मुद्दा समोर आणला आहे. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर या विषयाची मी प्राथमिक माहिती घेतली. खुली जागा ताब्यात घेण्याबाबत ग्रामपंचायती उदासीन असल्याचे चित्र समोर आले आहे. यातून अनेक ग्रामस्थांच्याही तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. या जागेवर वसाहतीतील नागरिक, ग्रामपंचायत व पर्यायाने शासनाचा हक्क असल्याने या जागा कुणालाही बळकावता येणार नाहीत. यासाठी कडक पावले उचलली जातील.अमन मित्तलमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर