शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

विषय समिती सदस्यत्वाचा गुंता कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 11:56 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेतील विषय समित्यांवर सदस्य म्हणून कोण जाणार यावरून सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरूच राहिल्याने निवडीचा गुंता कायम राहिला आहे.

ठळक मुद्देविषय समिती सदस्यत्वाचा गुंता कायमसदस्यांच्या बैठकांवर बैठका : प्रशासनाने मागविले अर्ज

कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील विषय समित्यांवर सदस्य म्हणून कोण जाणार यावरून सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरूच राहिल्याने निवडीचा गुंता कायम राहिला आहे.

अर्ज द्या असे सांगूनही प्रशासनाकडे गुरुवार संध्याकाळपर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नाही. दरम्यान, हा गुंता लवकर न सुटल्यास विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी लागेल, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.जिल्हा परिषदेत सत्ताबदलानंतर रिक्त झालेल्या पंचायत समिती सभापतींच्या १२ आणि पदाधिकाऱ्यांच्या सहा अशा समितीतील १८ जागांवर कोणाची वर्णी लावायची, यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान सुरू आहे.

या निमित्ताने सलोखा होत नसल्याने प्रशासनाने कायद्याचीच भाषा सुरू केल्याने सत्ताधारी व विरोधकांकडून कायदेशीर तरतुदींचा नव्याने अभ्यास केला जात आहे. बुधवारी (दि. २२) दिवसभर यावर काथ्याकूट केल्यानंतर गुरुवारीही यावरच खल सुरू होता. विरोधी सदस्यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे याबाबत विचारणा केली.दरम्यान, दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यानंतर उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या दालनात पक्षप्रतोदांसह सत्ताधारी सदस्यांसमवेत सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांची एकत्रित बैठक झाली.

यात पक्षप्रतोद उमेश आपटे यांनी, ‘१२ पंचायत समित्यांची नावे निश्चित झाली आहेत. ती वगळून उर्वरित सहा जागांसाठीची नावे निश्चित करा,’ असे सुचविले. याला आडसूळ यांनी आक्षेप घेत, ‘असे करता येणार नाही. १८ जागांसाठीच्या सदस्यांची नावे द्या. वेळेत न दिल्यास सर्वसाधारण सभा बोलावून हा विषय मतदानासाठी घेतला जाईल,’ असे सांगितले.प्रशासनाने बाजू मांडल्यानंतर पुन्हा एकदा सत्ताधारी गोटाची स्वतंत्र बैठक झाली. दरम्यान, दुपारी इच्छुक सदस्यांसह कारभारी गटाची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या बंगल्यावर बैठक होऊन यादीवर बराच काथ्याकूट केला गेला; पण प्रशासनाच्या ठाम भूमिकेमुळे सत्ताधारी सदस्यांचा हिरमोड झाला आहे. आता नेत्यांच्या कानांवर हा विषय घालण्याचे कारभाऱ्यांनी ठरविले आहे. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर