शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठातील ग्रंथालय सुरू करण्यासाठी रस्त्यावर अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 11:51 IST

Shivaji University, library, kolhapur शिवाजी विद्यापीठातील बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालय व अभ्यासिका ही विनाविलंब सुरू करावी. पीएच.डी. संशोधकांसाठी नवीन बांधलेले वसतिगृह सुरू करावे, या मागण्यांसाठी ऑल इंडिया यूथ आणि स्टुडंटस् फेडरेशनने सोमवारी रस्त्यावर अभ्यास हे आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव यांना दिले.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठातील ग्रंथालय सुरू करण्यासाठी रस्त्यावर अभ्यास ऑल इंडिया यूथ फेडरेशनचे आंदोलन : विविध मागण्या

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालय व अभ्यासिका ही विनाविलंब सुरू करावी. पीएच.डी. संशोधकांसाठी नवीन बांधलेले वसतिगृह सुरू करावे, या मागण्यांसाठी ऑल इंडिया यूथ आणि स्टुडंटस् फेडरेशनने सोमवारी रस्त्यावर अभ्यास हे आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव यांना दिले.फेडरेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारात हे आंदोलन केले. यावेळी त्यांनी ग्रंथालय अभ्यासिका बिनशर्त सुरू झाल्याच पाहिजे,  ग्रंथालय आमच्या हक्काचे, लढेंगे जितेंगे अशा घोषणा दिल्या. त्यानंतर शिष्टमंडळाने डॉ. गुरव यांच्याशी चर्चा केली.

पुढील आठ दिवसांत ग्रंथालये, अभ्यासिका सुरू करण्यात आली नाही, तर कुलगुरूंच्या कक्षामध्ये विद्यार्थ्यांना घेऊन अभ्यासाला बसण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. यावेळी फेडरेशनचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य गिरीश फोंडे, प्रशांत आंबी, आशुतोष गावडे, सुरेश कोकरे, केदार तहसीलदार, आरती रेडेकर, संदेश माने, योगेश कसबे, सुनील कोळी, रजत शेख, आदी उपस्थित होते.

इतर विद्यापीठामध्ये अभ्यासिका सुरू झाल्या आहेत. एक महिन्यापूर्वी आम्ही कुलगुरूंना निवेदन देऊन शासनाच्या आदेशानुसार ग्रंथालय, अभ्यासिका सुरू कराव्यात, अशी विनंती केली होती. पण, प्रशासनाने विद्यापीठ आवारातील बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालय, अभ्यासिका सुरू केलेली नाही. ही लवकर सुरू व्हावी या मागणीसाठी हे आंदोलन केले आहे.-गिरीश फोंडे

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूरlibraryवाचनालय