शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

संगीताच्या साथीत एकाग्रतेने अभ्यास सचिन जगताप यांचे संशोधन... विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 00:30 IST

अभिजात भारतीय संगीताने ब्रह्मानंदी टाळी लागते हे आपण जाणतोच; पण या संगीताने गणिताचे किचकट फॉर्म्युले, इंग्रजीच्या वाक्यरचनेत व्याकरणाची अचूकता, एकाग्रता, आत्मविश्वास आणि अभ्यास लक्षात राहतो, असा निष्कर्ष बासरीवादक प्रा. सचिन जगताप यांनी संशोधनातून मांडला आहे.

इंदुमती गणेश ।कोल्हापूर : अभिजात भारतीय संगीताने ब्रह्मानंदी टाळी लागते हे आपण जाणतोच; पण या संगीताने गणिताचे किचकट फॉर्म्युले, इंग्रजीच्या वाक्यरचनेत व्याकरणाची अचूकता, एकाग्रता, आत्मविश्वास आणि अभ्यास लक्षात राहतो, असा निष्कर्ष बासरीवादक प्रा. सचिन जगताप यांनी संशोधनातून मांडला आहे. संशोधनाचा हा प्रबंध ते जागतिक परिषदेत मांडणार आहेत.

प्रा. सचिन जगताप हे गेल्या २० वर्षांपासून बासरीवादन करत असून, शास्त्रीय संगीताचे व्यक्तीच्या मानसिकतेवर होणारे परिणाम, यावर त्यांचे गेल्या सात वर्षांपासून संशोधन सुरूआहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रतेचा अभाव लक्षात घेऊन प्रा. जगताप यांनी २०० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर प्रयोग केला. त्यांच्या अभिरुचीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे संगीत ऐकायला लावले. सकाळी उठल्यानंतर व अभ्यासाला बसण्यापूर्वी १५ मिनिटे अशी त्यांनी या म्युजिक थेरेपीची पद्धत वापरली. त्यानंतर प्रश्नावली भरून घेतली.

यात विद्यार्थ्यांनी संगीत ऐकल्यानंतर शांत, प्रसन्न, पहाटेची निरव शांतता, मनाला स्थिरता, श्रद्धेय शांतता, एकाग्रतेत वाढ, अभ्यास लक्षात राहत असल्याचे अनुभव मांडले आहेत. प्रा. जगताप विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन करतात, कार्यशाळा घेतात. संगीतातून अधिकारी, कर्मचारी यांच्या ताणतणावाचे व्यवस्थापन, कार्यशीलता वाढविणे, हे प्रात्यक्षिकासह मांडतात. परदेशातही त्यांनी यावर व्याख्याने दिली आहेत.संगीत ऐकवल्यानंतर सकारात्मकता आणि ऊर्जा वाढली. बासरीवर ठेवायचा माझा बोट लहानपणीच अर्धवट कापला आहे; त्यामुळे त्या बोटाने मला काही करता यायचे नाही; बासरीवादनाला सुरुवात केल्यानंतर एका महिन्यात माझ्या त्या बोटातही ताकद आली आहे. - निकिता वाकडकर, इंटिरिअर डिझायनर पुणे 

मी पूर्वी फार चंचल होतो, अभ्यासात लक्ष लागायचे नाही; पण भूप, दुर्गा, सारंग, काफी हे राग ऐकायला लागलो. हे संगीत ऐकल्यानंतर माझ्यातला चंचलपणा कमी झाला आणि स्थिर बसून अभ्यासाची सवय लागली.- ज्ञानेश रायबागकर, विद्यार्थी प्रॉडक्शन इंजिनिअरिंग

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmusicसंगीत