शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

आंतरराष्ट्रीय योगदिनाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

By admin | Updated: June 22, 2015 00:14 IST

शिरोली दुमाला येथे योगाची प्रात्यक्षिके

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरात विविध ठिकाणी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय छात्रसेनायेथील महासैनिक दरबार हॉलमध्ये ५६ महाराष्ट्र बटालियनतर्फे रविवारी ३६१ राष्ट्रीय छात्रसैनिकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने योगधारणा केली. कर्नल पी. सी. पवार यांच्या हस्ते योगासनांची सुरुवात झाली. यावेळी ‘क्रिडाई’ महाराष्ट्रचे उपाध्यक्ष राजीव परीख यांची प्रमुख उपस्थिती होती.लाईन बझार येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये झालेल्या या योग शिबिरासाठी परिसरातील दहा महाविद्यालयांसह कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सकाळी सात ते ७.३५ या दरम्यान योगासने केली. मानवाची शारीरिक व मानसिक स्थिती मजबूत ठेवणारी योग विद्या हा अद्भुत ठेवा आहे. भारताच्या या योगविद्येचे महत्त्व जगाला पटले आहे. दररोज योगासने करून शरीर व मनसंपदा तंदुरुस्त ठेवा, असे कर्नल पवार यांनी आवाहन केले. कृषी महाविद्यालयाचे प्रा. सुनील फुलसावंगे व गोखले महाविद्यालयाचे प्रा. बसुगडे यांनी आयोजनामध्ये सहभाग घेतला.छात्रसैनिक विद्यार्थिनींचा उत्साही सहभाग कृष्णा सांस्कृतिक भवनाची दोन सभागृहे व स्वामी विवेकानंद महाविद्यालयात ६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसीच्या छात्रसैनिक विद्यार्थिनींनी पहिल्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त योग प्रात्यक्षिके सादर केली. कोल्हापूर, सांगली, सातारा व रत्नागिरी या चारही जिल्ह्यांंतील एकूण १७ शाळा व १७ महाविद्यालयांमधील १,४१० छात्रसैनिक विद्यार्थिनींनी यामध्ये सहभागी झाल्या होत्या.यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून गायत्री शेवडे, पल्लवी बेंडके, लता देशमुख, आशा पाटील यांनी छात्रसैनिक विद्यार्थिनींकडून योगासनांचा सराव करून घेतला होता. ६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसीचे कामांडिंग आॅफिसर कर्नल चंद्रशेखर देशपांडे, प्रशिक्षणाधिकारी कर्नल आर. बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला. एनसीसीच्या आॅनररी मेजर प्रा. डॉ. रूपा शहा, सुभेदार मेजर दिनकर पाटील, सोनिया यादव यांनी विशेष योगदान दिले. एनसीसीच्या कोल्हापूर गटमुख्यालयाचे प्रमुख ब्रिगेडिअर पवनकुमार गंजू यांनी प्रात्यक्षिकांच्या ठिकाणी भेट देऊन या सर्व तयारीबद्दल सहकाऱ्यांचे मनापासून कौतुक केले.विवेकानंद महाविद्यालयविवेकानंद महाविद्यालयात मोठ्या उत्साहात योग दिन साजरा झाला. प्राचार्य शुभांगी गावडे व योग अभ्यासिका शुभदा कामत यांनी योगाचे महत्त्व समजावून दिले. यावेळी प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. योग दिनाच्या आयोजनात क्रीडाशिक्षकांनी महत्त्वाचे योगदान दिले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभूषण विद्यामंदिर हायस्कूलदेशभूषण हायस्कूल येथे योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपशिक्षणाधिकारी टी. एल. मोळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक आर. ए. गाट, एम. एस. सपाटे, ए. एस. वागरे, आदी शिक्षकवृंद उपस्थित होते. यशवंतराव पाटील हायस्कूलकसबा बावडा येथील यशवंतराव भाऊराव पाटील हायस्कूलमध्ये जागतिक योगदिनानिमित्त रामराजे सुतार यांनी योगामुळे शरीरावर होणारे चांगले परिणाम याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी मुख्याध्यापिका गौतमी पाटील, कलाशिक्षक दत्तात्रय चौगुले, शर्मिला पाटील, स्नेहाराणी साखळकर, नीता पाटील, संदीप कांबळे, शीतल भांगरे यांच्यासह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कर्मवीर इंग्लिश स्कूलबोंद्रेनगर रिंग रोड येथील कर्मवीर इंग्लिश स्कूल व शुभंकरोती प्ले स्कूलच्या वतीने योगदिनानिमित्त योगासन प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी योगतज्ज्ञ श्रद्धा लाड, डॉ. संयोगिता पाटील, रवी पाटील, संजय दंडगे, डॉ. प्रियांका सावंत, डॉ. संदेश कचरे, प्राचार्य ए. के. कचरे, सचिन पुंडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पालकही सहभागी झाले होते. हरिहर हायस्कूल लक्ष्मीपुरी येथील हरिहर हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापिका एस. एस. जोशी यांनी योगासनांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. यावेळी एस. पी. पाटील, आर. बी. पाटील यांच्यासह पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. जीवन कल्याण प्राथमिक विद्यालयकसबा बावडा येथील जीवन कल्याण विद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी क्रीडाशिक्षक टी. आर. पाटील यांनी योगाचे महत्त्व पटवून देत योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी मुख्याध्यापक मोहन आवळे, कुमार पाटील, सरदार पाटील यांच्यासह ४९४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)शिरोली दुमाला येथेयोगाची प्रात्यक्षिकेकोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या वतीने शिरोली दुमाला येथील एकनाथ विद्यालय व छत्रपती शिवाजीराजे हायस्कूल येथे ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना योगासनांची प्रात्यक्षिके व माहिती दिली. यावेळी अनिल सोलापुरे, संजय पाटील, माधव पाटील, संभाजी पाटील, सचिन पाटील, राहुल पाटील, ग. ज. पाटील, के. वाय. पाटील, आदी उपस्थित होते.