शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

बनावट प्रमाणपत्र देणाऱ्यास अटक

By admin | Updated: December 6, 2014 00:47 IST

आरोपी सांगलीचा : शिक्षकाची फसवणूक; प्रमाणपत्रे, शिक्के व २० हजार जप्त

कोल्हापूर : जातीचे बनावट वैधता प्रमाणपत्र देणाऱ्या सांगली जिल्ह्यातील संशयित बाळासाहेब ऊर्फ प्रशांत महादेव हारगे (वय ३२, रा. सलगरे, ता. मिरज) याला आज, शुक्रवारी कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानक परिसरात शाहूपुरी पोलीस व विभागीय जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांनी पकडले. त्याच्याकडील जातीचे बनावट वैधता प्रमाणपत्र, शिक्के व स्टॅम्प, २० हजार रुपये पोलिसांनी जप्त केले. त्याच्याकडे एका पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचा उपाध्यक्ष असलेले व्हिजिटिंग कार्ड पोलिसांना मिळाले आहे. त्याने सातारा जिल्ह्णातील कृष्णात आनंदा संकपाळ (३२, रा. सुरुल, ता. पाटण) या शिक्षकाची फसवणूक केली.याबाबत पोलिसांनी सांगितले की, कृष्णात संकपाळ हे म्हाऊळ (ता. पाटण) याठिकाणी एका शाळेत शिक्षक म्हणून काम करतात. त्यांना ‘कुणबी’ जातीचे वैधता प्रमाणपत्र पाहिजे होते. त्यासाठी त्यांनी मित्राला हा प्रकार सांगितला. मित्राने संशयित बाळासाहेब हारगे कोल्हापुरातील विचारेमाळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथील विभागीय जात पडताळणी समिती कार्यालय क्रमांक दोन येथे कामास असल्याचे सांगितले. त्यानुसार कृष्णात संकपाळ यांनी हारगे याची भेट घेतली तेव्हा जातीचे वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी ४० हजार रुपये द्यावे लागतात, असे त्याने सांगितले. थोड्या दिवसांनी हारगेने संकपाळ यांच्याशी संपर्क साधून ‘तुमचे जात वैधता प्रमाणपत्र तयार झाले आहे. ते कोल्हापुरातील कार्यालयातून घेऊन जा.’ असे सांगून त्या प्रमाणपत्रावरील नंबर फॅक्स केला. आज, शुक्रवारी दुपारी कृष्णात संकपाळ हा कोल्हापुरातील कार्यालयात आला. त्यावेळी आपल्याजवळील फॅक्स त्याने तेथील कर्मचाऱ्यांना दाखविला. त्यांनी त्यांना समितीचे उपायुक्त सुनील वारे यांना भेटण्यास सांगितले. संकपाळ यांनी वारे यांना भेटून हा फॅक्स दाखविला. वारे यांनी त्याची तपासणी करून हा प्रमाणपत्रावरील नंबर नसल्याचे संकपाळ यांना सांगितले. हा फ ॅक्स कोणी दिला, अशी विचारणा वारे यांनी केली असता त्यांनी बाळासाहेब हारगे याचे नाव सांगितले. त्यांना या प्रकरणाचा संशय वाटू लागल्याने त्यांनी विभागीय जाती प्रमाण समिती कार्यालय क्रमांक दोन दक्षता पथकाच्या पोलीस निरीक्षक निर्मला लोकरे-माने यांना हा प्रकार सांगितला. तत्काळ लोकरे या कार्यालयात आल्या. त्यांनी संकपाळ यांना मोबाईलवरून हारगे याच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यानंतर सर्वजण कार्यालयामधून बाहेर पडून मध्यवर्ती बसस्थानककडे जात असताना पुन्हा हारगेचा संकपाळ यांना फोन आला. मीच कोल्हापुरात दुपारी येतो,असा त्याने निरोप दिला. तोपर्यंत शाहूपुरी पोलीस, वाहतूक शाखेचे पोलीस यांनी हारगेला पकडण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सापळा रचला. दुपारी एका हॉटेलच्या दारात दबा धरून बसलेल्या पोलिसांनी हारगेला पकडले. कोणाकडून अशा प्रकारची फसवणूक होत असेल तर तत्काळ अर्जदारांनी स्वत: कार्यालयाशी संपर्क साधावा. कोणीही शॉर्टकटचा मार्ग अवलंबू नये.- सुनील वारे, उपायुक्त तथा सदस्य, विभागीय जात पडताळणी समिती कार्यालय क्रमांक दोन, कोल्हापूर.फसवणुकीसह खोट्या दस्तऐवजचे गुन्हेभारतीय दंडविधान संहिता कलम ४२०, ४६७, ४६८, ४६९ व ४७१ अनुसार कारवाई करण्यात आली आहे. हारगेवर फसवणूक, खोटे दस्तऐवज अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मोठी टोळी असण्याची शक्यता...बाळासाहेब हारगे हा एका पक्षाचा एका सेलचा उपाध्यक्ष म्हणून काम करीत असल्याचे त्याचे व्हिजिटिंग कार्ड पोलिसांना सापडले आहे. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने माझा काही संबंध नाही, दुसरा एजंट आहे, असे पोलिसांना सांगून आतापर्यंत अशा प्रकारची सुमारे दीडशे प्रमाणपत्रे दिली असल्याचे सांगितले.