शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी ची चाके गुरूवारपासून पुन्हा रुळावर येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 18:19 IST

गेल्या चार महिन्यांपासून बंद पडलेली एस.टी.चाके आता पुन्हा गतीमान होणार आहेत राज्य शासनाने आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली आहे. त्यानूसार कोल्हापूर विभागाकडून सागंली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी या चार जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर  गुरूवारपासून प्रवासी वाहतुक सुरू होणार आहे. अशी माहीती एसटी.महामंडळाचे कोल्हापूर विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.

ठळक मुद्देचार जिल्ह्यात प्रवासी वाहतुकीस परवानगी प्रवाशांना स्वॅब चाचणीविना प्रवास करता येणार

कोल्हापूर : गेल्या चार महिन्यांपासून बंद पडलेली एस.टी.चाके आता पुन्हा गतीमान होणार आहेत राज्य शासनाने आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली आहे. त्यानूसार कोल्हापूर विभागाकडून सागंली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी या चार जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर  गुरूवारपासून प्रवासी वाहतुक सुरू होणार आहे. अशी माहीती एसटी.महामंडळाचे कोल्हापूर विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने एस.टी.महामंडळाची बस सेवा गेल्या चार महिन्यापासून बंद केली होती. या काळात महामंडळाला उत्पन्नाचे कोणतेच साधन नसल्याने मोठ्या अर्थिक फटका बसला. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार काहीकाळ रखडले होते. आंतरजिल्हा प्रवासी वाहतुक बंद केल्याने इच्छुक प्रवाशांची मोठी कोंडी झाली होती.

प्रवाशांची गैरसोय आणि काही प्रमाणात आटोक्यात आलेल्या कोरोना संसर्गामुळे राज्य शासनाने आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली. त्यानूसार कोल्हापूर विभागातून सांगली ,सातारा, सोलापूर, रत्नागिरी या चार जिल्ह्यासाठी  गुरूवारपासून प्रवासी वाहतुक सुरू होत आहे. ज्या मार्गावर प्रवाशांची मागणी अधिक असेल त्या मार्गावर सोईप्रमाणे जादा बसेसेही सोडल्या जाणार आहेत.

याकरीता २५ बसेस चालक, वाहकांसह सज्ज ठेवण्यात आ्रल्या आहेत. विशेष म्हणजे एस.टी.बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारच्या कोरोना चाचणीस सामोरे जावे लागणार नाही. असेही विभाग नियंत्रक पलंगे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :state transportएसटीkolhapurकोल्हापूर